Actress Demanded Sex From Waiter, Once Again In Limelight During Corona Lockdown | वेटरकडे सेक्सची मागणी करणारी अभिनेत्री चर्चेत,कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगसाठी सुचवली आयडीया

वेटरकडे सेक्सची मागणी करणारी अभिनेत्री चर्चेत,कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगसाठी सुचवली आयडीया

अभिनेत्री रिया सेन हिनं वयाच्या 19व्या वर्षी स्टाईल या सिनेमातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. मात्र काही मोजके सिनेमांचा अपवाद वगळता तिला बॉलीवुडमध्ये फारसं यश मिळालं नाही. स्टाईल, झनकार बीट्स आणि अपना सपना मनी मनी या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली खरी मात्र आज रियाने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमा केले आहेत. करियरच्या सुरुवातीपासूनच रियाकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या. या सेक्सी अभिनेत्रीचं खासगी जीवनही तितकंच वादग्रस्त राहिलं. सध्या ती बॉलिवूडमधून गायब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.

बॉलिवूडमध्ये कोरोनाने सगळ्यांनाच धडकी भरवली आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली. एकमागोमाग एक करोनाची लागण होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत.कोरोना काळात सध्या सारेच सेलिब्रेटी मास्क लावा, हात धुवा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा असे सांगताना दिसत आहेत. मात्र एका अभिनेत्रीने सोशल डिस्टंसिंगचे पालन कसे करावे याबाबतची आयडीयाच सुचवली आहे.फोटो शेअर करुन तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. तिचा असा अंदाज पाहून सारेच आवाक झाले आहेत. या फोटोमुळे कोरोना काळातही रिया सेनच्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगल्या आहेत.

रियाचा भन्नाट किस्सा ज्याची आजही तुफान चर्चा होते. रिया नाव येताच तो किस्सा आठवला नाही तरच नवल. मार्च २०१७ मध्ये रिया एका रेस्टॉरंटमध्ये गेली त्यावेळी रियाने या रेस्टॉरंन्टच्या वेटरकडे चक्क सेक्सची मागणी केली. खरं तर रियाला डिश ऑर्डर करायची होती. मात्र त्यावेळी रियाने म्हटलं होतं की Could I have some SEX please. हे ऐकून तर वेटरला घामच सुटला. मात्र आपण काही तरी भलतंच बोलून गेल्याचं रियाला उमगलं आणि तिनं ती चूक सुधारली म्हणे..  मात्र तिने वेटरकडे सेक्सची मागणी केली याचीच चर्चा जास्त रंगली. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Demanded Sex From Waiter, Once Again In Limelight During Corona Lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.