दिशा पटानीने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींहून जास्त कमाई केली आहे. कमी कालावधीत दिशाने सलमान खान व टायगर श्रॉफ यासारख्या कलाकारांसोबत काम केलं आहे. आता ती पुन्हा एकदा सलमान खानसोबत 'राधे' चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती 'मलंग' चित्रपटात काम करताना दिसणार आहे. 


'मलंग' चित्रपटामुळे दिशा पटानी चर्चेत आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि ट्रेलरला खूप पसंतीदेखील मिळते आहे. या पसंतीमागे दिशादेखील कारणीभूत आहे. कारण या ट्रेलरमध्ये ती बिकनीमध्ये दिसली आणि तिच्या बिकनीतील अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.


आदित्य रॉय कपूर मलंग चित्रपटात दिशा पटानीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आदित्य व दिशाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप चांगली वाटते आहे. या चित्रपटातील एक पोस्टरदेखील चर्चेत आले आहे ज्यात दिशा व आदित्य एकमेकांना किस करताना दिसले.


नुकतेच एका मुलाखतीत आदित्यला किसिंग सीनबद्दल विचारले की दिशोसोबत किसिंग सीन करताना काही प्रॉब्लेम झाला होता का? यावर आदित्य म्हणाला की, किसिंग सीनच्या शूटिंगदरम्यान त्याला जराही अडचण आली नाही आणि विचित्र वाटलं देखील नाही.


तसेच दिशाचं कौतूक करत म्हणाला की खूप सहजतेनं दिशाने हा सीन केला. दिशाचं वजन कमी असल्यामुळे तिला खांद्यावर उचलून घेताना अडचण आली नाही. 


मोहित सूरी दिग्दर्शित मलंग चित्रपटात दिशा पटानी व आदित्य रॉय कपूर सोबत अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: The actor was comforter when he kissed to Disha Patani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.