Actor Varun Dhawan and Natasha Dalal's wedding preparations at The Mansion House in Alibag-Saswane | अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची तयारी, अलिबाग-सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’ मध्ये लगबग

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची तयारी, अलिबाग-सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’ मध्ये लगबग

रायगड -बॉलीवुडचा अभिनेता वरुण धवन त्याची बालमैत्रिण फॅशन डिझायनर नताशा दलाल हे विवाहाच्या पवित्र नात्यात रविवारी अडकणार आहेत. अलिबाग तालुक्यातील सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे हा विवाह समारंभ कुटुंबीय आणि काही मोजक्याच मित्रमंडळींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. शनिवारी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडल्याचे सुत्रांनी सांगितले. 

शुक्रवारी (22 जानेवारी) सकाळी नताशा दलाल हिला तिच्या मुंबईतील घरातून कुटुंबासह अलिबागला जाण्यासाठी कारमध्ये बसताना पाहिले हाेते. नताशाने यावेळी पांढर्‍या रंगाचा जम्पसूट आणि पांढर्‍या रंगाचा मास्क परिधान केला होता. तर दुसरीकडे वरुण धवन, त्याचे वडिल डेव्हिड धवन, आई लाली धवन, बहिण अंजनी हेही शुक्रवारीच मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाहून अलिबागकडे निघल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.0वरुण आणि नताशा या जोडप्याने आपल्या विवाहाबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे. 

सहावीमध्ये असताना वरुण आणि नताशाची पहिली भेट झाली होती. अकरावी-बारावीपर्यंत ते चांगले मित्र होते. नंतर ही मैत्री प्रेमात रुपांतरीत झाली. गतवर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र रविवारी (24 जानेवारी) ते विवाहाच्या पवित्र बंधनात अडकणार आहेत. अत्यंत साध्या आणि मोजक्याच जवळच्या मित्रपरिवार आणि कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत हे जोडपे नव्या आयुष्यात पाऊल ठेवणार आहे. जेथे हा विवाह समारंभ पार पडणार आहे त्या अलिबाग तालुक्यातील सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’मध्ये जोरदार तयारी झाली आहे. ‘डेस्टिनेशन वेडींग’साठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. सेलेब्रिटी विवाहादरम्यान कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये, शांतता-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी मांडवा सागरी पोलीस सतर्क आहेत, अशी माहिती मांडवा सागरी पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक धर्मराज साेनके यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor Varun Dhawan and Natasha Dalal's wedding preparations at The Mansion House in Alibag-Saswane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.