Actor Sonu Sood to star in 'Kisan', wishes from Amitabh Bachchan | अभिनेता सोनू सूद झळकणार 'किसान' चित्रपटात, अमिताभ बच्चन यांनी दिल्या शुभेच्छा

अभिनेता सोनू सूद झळकणार 'किसान' चित्रपटात, अमिताभ बच्चन यांनी दिल्या शुभेच्छा

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी नुकतीच अभिनेता सोनू सूदच्या 'किसान' चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाचे दिग्दर्शन ई निवास हे करत आहेत. आयुषमान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणारे राज शांडिल्य 'किसान' चित्रपटाची निर्मिती करीत आहेत.

ई निवास दिग्दर्शित आणि सोनू सूदच्या किसान चित्रपटाला अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने सोनू सूदच्या नवीन चित्रपटाशी संबंधित एक फोटोही शेअर केला आहे.

केबीसीच्या सेटवर सोनू सूदचे 'आई एम नो मसीहा' हे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या काळात जगभरातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. बऱ्याच लोकांचा रोजगार गेला आणि उपासमारीची वेळ आली होती.आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलो मीटर दुर राहणाऱ्या लोकांना तर घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते. अशावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद रस्तावर उतरून लोकांची मदत करत होता.


त्याच्या या सर्व कार्यासाठी तेलंगणातील सिद्दीपेट जिल्हातील डब्बा टांडागावातील लोकांनी सोनू सूदला समर्पित मंदिर बांधले आहे. या मंदिराचे ग्रामस्थांनी उद्घाटन केले. यावेळी सोनू सूदची आरती देखील करण्यात आली होती. महिलांनी पारंपरिक वेषभूषा करून गाणे देखील म्हणाले होते. जिल्हा परिषद सदस्य गिरी कोंडल रेड्डी म्हणाले की, कोरोनो व्हायरसच्या काळात सोनू सूदने जनतेसाठी मोठे काम केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor Sonu Sood to star in 'Kisan', wishes from Amitabh Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.