रणदीप हुड्डाचा ‘संस्कारी’ डॉगी, त्याचा हा फोटो पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 02:06 PM2021-06-29T14:06:16+5:302021-06-29T14:07:34+5:30

तूर्तास रणदीप नाही तर त्याच्या लाडक्या कुत्र्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर रणदीपचा लाडका पाळीव कुत्रा चांगलाच फेमस झाला आहे.

Actor Randeep Hooda shared a cute picture with his pet dog joining him for a puja |  रणदीप हुड्डाचा ‘संस्कारी’ डॉगी, त्याचा हा फोटो पाहून थक्क व्हाल

 रणदीप हुड्डाचा ‘संस्कारी’ डॉगी, त्याचा हा फोटो पाहून थक्क व्हाल

googlenewsNext
ठळक मुद्देरणदीप च्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकताच तो अभिनेता सलमान खानच्या ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात दिसला होता.

फार कमी काळात रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. पण तूर्तास रणदीप नाही तर त्याच्या लाडक्या कुत्र्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर रणदीपचा लाडका पाळीव कुत्रा चांगलाच फेमस झाला आहे. नुसता फेमस नाही तर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. शिवाय आपल्या कुत्र्याला खूप चांगले संस्कार दिल्याबद्दल रणदीपचेही गोडवे गायले जात आहेत. 
 सोशल मीडियावर रणदीप व त्याच्या डॉगीचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. (Randeep Hooda shared a cute picture with his pet dog)

रणदीप सोबत हा डॉगी चक्क देवाची पूजा करत आहे. रणदीपच्या डॉगीचे नाव बाम्बी आहे. बाम्बीसोबतचे अनेक फोटो रणदीप शेअर करत असतो. या ताज्या फोटोत रणदीप व बाम्बी दोघेही मनोभावे देवाची पूजा करताना दिसत आहेत. ‘संस्कारी डॉग अलर्ट’ अशा आशयाचे कॅप्शन देत रणदीपने हा फोटो शेअर केला आहे.
हा फोटो चाहत्यांना प्रचंड भावला आहे. यावर अनेक सेलिब्रिटींनी ही रणदीप ला कमेंट्स दिल्या आहेत.  

रणदीप च्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकताच तो अभिनेता सलमान खानच्या ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात दिसला होता. यात तो निगेटीव्ह भूमिका साकारताना दिसला होता.   लवकरच तो ‘अन फेअर लव्हली’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तो अभिनेत्री इलियाना डीक्रुझ सोबत तो स्क्रिन शेअर करणार आहे.
2001 मध्ये मीरा नायर यांच्या ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे रणदीपने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. पण यानंतर सलग चार वर्षे रणदीपला कुणीही काम देईना. यानंतर 2005 मध्ये रामगोपाल वर्मा यांनी त्याला आपल्या ‘डी’ चित्रपटासाठी साइन केले आणि यानंतर रणदीपने कधीच मागे वळून पाहिले नाही.

Web Title: Actor Randeep Hooda shared a cute picture with his pet dog joining him for a puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.