actor karn beats model swati mehra in indore | या अभिनेत्याने मॉडेल पत्नीला केली बेदम मारहाण, फाटला कानाचा पडदा
या अभिनेत्याने मॉडेल पत्नीला केली बेदम मारहाण, फाटला कानाचा पडदा

ठळक मुद्देयाचवर्षी फेब्रुवारीत स्वाती व कर्णचे लग्न झाले होते.

कौटुंबिक हिंसाचाराची अनेक प्रकरणे आपण ऐकतो. मनोरंजनसृष्टीही याला अपवाद नाही. अलीकडे एका अभिनेत्याने आपल्या पत्नीला मारहाण केली. इतकी की, तिच्या कानाचा पडदा फाटला. या अभिनेत्याचे नाव आहे कर्ण शास्त्री.
कर्णची पत्नी स्वाती मेहरा हिने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत, मुंबईच्या गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्वाती ही पेशाने मॉडेल आहे. आपबीती ऐकवताना स्वातीने सांगितले की, कर्णने आधी मला मारहाण केली आणि नंतर घराबाहेर काढले. लग्नाच्या दुस-या महिन्यापासून हुंड्यासाठी त्याने माझा छळ चालवला होता. या मारहाणीत माझ्या कानाचा पडदा फाटला. एकदा त्याने मला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

कर्ण मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे. मी कधीही स्वातीवर हात उचलला नाही. पण आता आम्ही सोबत राहत नाही. आम्ही परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र स्वाती वेगवेगळ्या प्रकारे माझी बदनामी करतेय. माझे करिअर उद्धवस्त करण्याचा तिचा डाव आहे, असे कर्ण म्हणाला.
याचवर्षी फेब्रुवारीत स्वाती व कर्णचे लग्न झाले होते. दोघांचेही लव्हमॅरेज होते. एका चित्रपटाच्या शूटींगदरम्यान या दोघांची भेट झाली होती. या चित्रपटात कर्ण मुख्य भूमिकेत होता.  


Web Title: actor karn beats model swati mehra in indore
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.