ठळक मुद्देहुमा काही वर्षांपूर्वी एका चुकीच्या कारणामुळे चर्चेत आली होती. हुमावर एका लहान मुलीचे अपहरण केल्याचा आरोप लावण्यात आला होता आणि हा आरोप सिद्ध झाल्याने तिला शिक्षा देखील झाली होती.

मैंने प्यार किया या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. या चित्रपटाची कथा, कलाकारांचे अभिनय सगळेच काही प्रेक्षकांना भावले होते. या चित्रपटातील सगळीच गाणी प्रचंड गाजली होती. या चित्रपटातील मुख्य कलाकारच नव्हे तर छोट्या भूमिकेत असलेल्या प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले होते. या चित्रपटात दुधवालीच्या भूमिकेत असलेली नायिका तुम्हाला आठवते का? लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मागे पुढे करणारी ही नायिका मैंने प्यार किया या चित्रपटाच्या प्रसिद्ध अंताक्षरीमध्ये देखील झळकली होती.

सलमान खानच्या मैंने प्यार किया या चित्रपटात दुधवालीच्या भूमिकेत असलेल्या या अभिनेत्रीचे नाव हुमा खान असून तिने या चित्रपटासोबतच अनिल कपूर आणि अमृता सिंग यांच्या चमेली की शादी या चित्रपटामध्ये काम केले होते. तसेच ती काही सी ग्रेड आणि हॉरर चित्रपटांमध्ये झळकली होती. रामसे बंधुच्या अनेक चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. हुमा ऐंशी-नव्वदीच्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये झळकली असली तरी ती काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. 

हुमा काही वर्षांपूर्वी एका चुकीच्या कारणामुळे चर्चेत आली होती. हुमावर एका लहान मुलीचे अपहरण केल्याचा आरोप लावण्यात आला होता आणि हा आरोप सिद्ध झाल्याने तिला शिक्षा देखील झाली होती. हुमाला अभिनयक्षेत्रात चांगल्या भूमिका मिळत नसल्याने ती मुंबई सोडून पुण्याला राहायला गेली होती. पुण्याला जाताना ती तिच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या मुलीला सोबत घेऊन गेली होती. या मुलीकडून ती घरातील सगळी कामं करून घ्यायची. तसेच ती तिला मारहाण देखील करायची असा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता. हुमाकडे ही मुलगी कित्येक महिने होती. त्या दरम्यान ती तिच्या आईला दर महिना 1500 रुपये पाठवत असे. ती करत असलेल्या मारहाणीमुळे तिच्यावर केस दाखल झाली आणि तिला तीन वर्षांची शिक्षा झाली होती. 


Web Title: Actor Huma Khan who had worked with salman khan in maine pyar kiya jailed for torturing a minor girl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.