अक्षय कुमारच्या आईची प्रकृती खालावली, ICU मध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:08 PM2021-09-06T19:08:01+5:302021-09-06T19:30:37+5:30

आईच्या प्रकृतीची माहिती मिळताच अक्षय कुमार इंग्लंडवरून भारतात परतला आहे. तो सोमवारी सकाळी भारतात पोहोचला. अक्षय इंग्लंडमध्ये सिंड्रेला चित्रपटाचे शूटिंग करत होता.

Actor Akshay kumar mother Aruna Bhatia is admitted at mumbai Hiranandani hospital in a critical condition | अक्षय कुमारच्या आईची प्रकृती खालावली, ICU मध्ये दाखल

अक्षय कुमारच्या आईची प्रकृती खालावली, ICU मध्ये दाखल

Next


मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांची प्रकृती खालावली असून त्यांना  हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. कुटुंबीयांच्या विनंतीमुळे रुग्णालयाने अरुणा भाटिया यांच्यावरील उपचारांसंदर्भात अद्याप कसलेही भाष्य केलेले नाही. त्यांना शुक्रवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Actor Akshay kumar mother Aruna Bhatia is admitted at mumbai Hiranandani hospital in a critical condition)

शूटिंगवरून परतला अक्षय कुमार -
सांगण्यात येते, की आईच्या प्रकृतीची माहिती मिळताच अक्षय कुमार इंग्लंडवरून भारतात परतला आहे. तो सोमवारी सकाळी भारतात पोहोचला. अक्षय इंग्लंडमध्ये सिंड्रेला चित्रपटाचे शूटिंग करत होता. अक्षय नसतानाही या चित्रपटाचे शूटिंग सुरूच राहणार आहे. आता असे सीन्स शूट केले जातील ज्यांत अक्षयची गरज नाही.

इतना अ‍ॅटिट्यूड किस बात का? अक्षय कुमारचं ‘ते’ वागणं चाहत्यांना खटकलं, पाहा व्हिडीओ

आईसोबत घालवतो वेळ - 
गेल्या वर्षी अक्षय कुमारने लंडनमध्ये बेल बॉटम चित्रपटाचे शूटिंग केले होते. त्यावेळी, त्याने आईला वेळ देण्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली. यात त्याने सांगितले होते, की तो व्यस्त वेळेतूनही वेळ काढतो आणि आईबरोबर वेळ घालवतो. तसेच, शूटिंगमधून वेळ काढून मी लंडनमध्ये माझ्या आईसोबत वेळ घालवत आहे. आपण कितीही मोठे असाल अथवा व्यस्त असाल, पण हे विसरू नका, की आई-वडीलही म्हातारे होत आहेत... त्यामुळे, तुम्हाला जेव्हा शक्य असेल, त्यांच्यासोबत वेळ घालवा.

या चित्रपटांत दिसणार अक्षय कुमार-
अक्षय कुमारचा सिंडरेला चित्रपट हा एक सायकलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. यात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंह दिसेल. हा चित्रपट बेल बॉटम चित्रपटाचे दिग्दर्शक रणजित तिवारी दिग्दर्शित करत आहेत. याशिवाय अक्षय रक्षाबंधन, राम सेतू, सूर्यवंशी आणि अतरंगी रे, या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

Web Title: Actor Akshay kumar mother Aruna Bhatia is admitted at mumbai Hiranandani hospital in a critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app