acharya chiranjeevi ram charan starrer film teaser out | एकदम कडक! ‘आचार्य’चा टीजर रिलीज, ‘बापलेक’ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र

एकदम कडक! ‘आचार्य’चा टीजर रिलीज, ‘बापलेक’ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र

ठळक मुद्देचिरंजीवी, रामचरण आणि काजल अग्रवाल स्टारर ‘आचार्य’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा कोरताला शिव यांनी दिग्दर्शित केला आहे.

सुपरस्टार राम चरण  लवकरच आगामी चित्रपट ‘आचार्य’मध्ये त्याच्या वडिलांसोबत दिसणार आहे. तूर्तास या सिनेमाचा टीजर रिलीज झालाये आणि या टीजरने इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
टीजरमध्ये सुपरस्टार चिरंजीवी जबरदस्त भूमिकेत दिसत आहेत. त्यांचे अ‍ॅक्शन सीन्स इतके जबरदस्त आहेत की, चाहते क्रेजी झाले आहेत. चित्रपटात चिरंजीवीचा मुलगा रामचरणही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. त्याची झलक टीजरमध्ये पाहणे इंटरेस्टिंग आहे.

हा चित्रपट गेल्या काही काळापासून बराच चर्चेत आहे. वडिलांसोबत काम करणे हे रामचरणसाठी एक स्वप्न होते. ‘आचार्य’च्या निमित्ताने त्याचे हे स्वप्न पूर्ण झालेय. चाहतेही या सिनेमात बाप-लेकाची जोडी बघण्यासाठी आतुर आहेत.  माझ्या वडिलांसोबत मी स्क्रीन शेअर करणार आहे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माज्यासाठी फक्त हा चित्रपट नसून त्यापेक्षा अधिक आहे. मी यासाठी चित्रपटाचे निमार्ते आणि पूर्ण टिमचे आभार मानतो, असे रामचरण या चित्रपटासंदर्भात म्हणाला होता.

चिरंजीवी, रामचरण आणि काजल अग्रवाल स्टारर ‘आचार्य’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा कोरताला शिव यांनी दिग्दर्शित केला आहे. याच वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस यतोय.
‘आचार्य’ या सिनेमाशिवाय रामचरण ‘आरआरआर’ हा सिनेमाही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. येत्या 13 आॅक्टोबरला हा सिनेमा रिलीज होतोय.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: acharya chiranjeevi ram charan starrer film teaser out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.