ऐश्वर्या राय की अभिषेक बच्चन कोणाला मिळते जास्त मानधन, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 07:30 PM2021-06-28T19:30:00+5:302021-06-28T19:30:00+5:30

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन दोघांमध्ये जितकी जबरदस्त ऑनस्क्रीन केमिस्ट्री आहे तितकीच ऑफस्क्रीनही दोघांमध्ये केमिस्ट्री पाहायला मिळते. दोघांची जोडी लग्नाआधी आणि लग्नानंतरही तितकीच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरते.

Abhishek Bachchan Paid less fees than wife aishwarya rai in eight films they work together here is detail | ऐश्वर्या राय की अभिषेक बच्चन कोणाला मिळते जास्त मानधन, जाणून घ्या

ऐश्वर्या राय की अभिषेक बच्चन कोणाला मिळते जास्त मानधन, जाणून घ्या

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये कलाकारांना मिळणा-या मानधनाबद्दल बर्‍याचदा वाद सुरू असतो. काहीजण म्हणतात की नायिकेलाही नायकाप्रमाणेच मानधन मिळायला हवे तर काहींनी टॅलेंटनुसार प्रत्येकाला मानधन मिळत असल्याचे बोलताना दिसतात.दरम्यान,अभिषेक बच्चनला पत्नी ऐश्वर्या रायपेक्षा कमी फी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या कपलने एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे पण अभिषेकपेक्षा ऐश्वर्या रायला जास्त मानधन मिळते. अभिषेकने स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला होता की ऐश्वर्याला त्याच्या नऊपैकी 8 चित्रपटांमध्ये ऐश्वर्याला जास्त मानधन दिले गेले होते.

 


मी माझ्या पत्नीबरोबर ९ चित्रपटांमध्ये काम केले आहे. आम्हाला दोघांनाही मिळणा-या मानधनाचा आकडा नक्कीच आश्चर्यचकीत करणारा असतो.माझ्यापेक्षा जास्त मानधन ऐश्वर्याला मिळते. दीपिका पादुकोणला पीकू या चित्रपटात सर्वाधिक रक्कम देण्यात आली होती. हा एक व्यवसाय आहे जर तुमच्या टॅलेंनुसार तुम्हाला मानधन दिले जाते. तुम्ही टॅलेंटमध्ये कुठे तरी कमी पडत असाल तर कोणतीही अभिनेत्री शाहरुख खानसारख्या अभिनेत्याला मिळणा-या माधनाची अपेक्षा करु शकत नाही. 

ऐश्वर्या आणि अभिषेकने 'ढाई अक्षर प्रेम के', 'कुछ ना कहो', 'बंटी और बबली', 'उमराव जान', 'धूम-2', और 'गुरु' सिनेमात एकत्र झळकले होते. लग्नानंतर  'सरकार राज' आणि 'रावन' सिनेमातही दोघांच्या जोडीला प्रचंड पसंती मिळाली होती.

 

मुळात ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांमध्ये जितकी जबरदस्त ऑनस्क्रीन केमिस्ट्री आहे तितकीच ऑफस्क्रीनही दोघांमध्ये केमिस्ट्री पाहायला मिळते. दोघांची जोडी लग्नाआधी आणि लग्नानंतरही तितकीच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरते. दोघांना मिळणारे मानधन जरी वेगळे असले तरी  देशातच नाही तर जगभरात कोट्यवधी फॅन्स आहेत. याच चाहत्यांचे प्रेम त्यांना मिळणा-या मानधनाच्या आकड्यापेक्षाही अमुल्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये.

 

ऐश्वर्या राय बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर  2018 मध्ये फन्ने खान या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता ऐश्वर्या मणिरत्नमच्या ‘पोन्निन सेल्वान’ या चित्रपटात काम करत आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये बनविलेल्या या चित्रपटात ऐश्वर्या पहिल्यांदाच डबल भूमिका साकारत आहे.तर अभिषेक बच्चन  बॉब बिस्वासमध्ये झळकणार आहे. याशिवाय दसवी सिनेमात दिसणार असून या चित्रपटात त्यांच्यासोबत निमरत कौर आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत.
 

Web Title: Abhishek Bachchan Paid less fees than wife aishwarya rai in eight films they work together here is detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.