Abhishek Bachchan asked drugs hai kya actor gave befitting reply to troller | यूजरने अभिषेक बच्चनला विचारले - ड्रग्स आहे का? अभिनेत्याच्या उत्तराने त्याची बोलती झाली बंद...

यूजरने अभिषेक बच्चनला विचारले - ड्रग्स आहे का? अभिनेत्याच्या उत्तराने त्याची बोलती झाली बंद...

अभिनेता अभिषेक बच्चनसोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव राहतो. नुकतीच थिएटर सुरू करण्याची घोषणा सरकारने केली. त्यावर अभिषेकने ट्विट करून आनंद व्यक्त केला होता. अभिषेक नेहमीच ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसला आहे. पुन्हा एकदा अभिषेकने ड्रग्सबाबत विचारणा करणाऱ्या एका यूजरला चांगलाच धडा शिकवलाय.

यूजरने विचारले हॅश आहे का?

सध्या बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन चर्चेचा विषय ठरत आहे. दीपिका पादुकोणचं चॅट समोर आलं होतं. ज्यात तिने मॅनेजरला माल है क्या? असं विचारलं होतं. यावरूनच चिमटा काढत एका यूजरने अभिषेकला विचारले की, 'हॅश आहे का?'. अभिषेकने या यूजरला मजेदार उत्तर दिलं आहे.

अभिषेकने लिहिले की, 'नाही. सॉरी. असं करू नकोस. पण मला तुझी मदत करण्यात आनंद होईल आणि तुला मुंबई पोलिसांसमोर नेण्यातही. मला विश्वास आहे की, मुंबई पोलीस तुझ्या गरजा जाणून घेऊन आनंदी होईल. ते तुझी मदत करू शकतील'. ट्रोलरला दिलेल्या या उत्तराने अभिषेक बच्चनने फॅन्स मन जिकंलय.

अभिषेक बच्चनच्या उत्तरानंतर ट्रोलरने लिहिले की, तुझा पीआर मला त्रास देत आहे. शेमलेस बच्चन. ज्यावर अभिषेकने उत्तर दिलं की, मॅम माझा कुणीही पीआर नाही. यावर काही फॅन्सनी अभिषेकला सल्ला दिला की, अशा लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. दरम्यान ही पहिलीच वेळ नाही की, अभिषेकने एखाद्या यूजरवर निशाणा साधला. अभिषेकला नेहमीच त्याच्या कामावरून तर कधी अभिनयावरून ट्रोल केलं जातं. मात्र, गप्प बसेल तो अभिषेक कुठे. तो यूजर्सना सडेतोड उत्तर देत असतो.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Abhishek Bachchan asked drugs hai kya actor gave befitting reply to troller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.