आमिर खानचे या चित्रपटात दिसणार तीन वेगवेगळे लूक, पहा त्याचे हे लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 03:35 PM2020-02-05T15:35:28+5:302020-02-05T15:36:31+5:30

'लाल सिंग चड्ढा' चित्रपटातून आमिर खान दोन वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे.

Aamir Khan will be seen in three different looks in Laal Singh Chhaddha film, see his look | आमिर खानचे या चित्रपटात दिसणार तीन वेगवेगळे लूक, पहा त्याचे हे लूक

आमिर खानचे या चित्रपटात दिसणार तीन वेगवेगळे लूक, पहा त्याचे हे लूक

googlenewsNext


बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान नेहमी हटके भूमिका करताना दिसतो. चित्रपटातील भूमिका खास ठरावी यासाठी या अभिनेत्याला एका अवतारातून दुसऱ्या अवतारात शिरताना सगळ्यांनीच पाहिले आहे. त्यासाठी कधी त्याने पगडीबरोबर लांब दाढी धारण केली तर कधी खुल्या केसांबरोबर दाढी, कधी क्रू कट लुक तर कधी आणखी काही. आता आपला आगामी चित्रपट लाल सिंग चढढासाठी देखील तो असेच काहीतरी हटके प्रयोग करताना दिसून येणार आहे. 

'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटासाठी लांब दाढी ठेवल्यानंतर आता तो अलिकडेच क्लीन शेव लूकमध्ये दिसून आला. आता तो पंजाबमध्ये चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे. आमीरच्या सरदारच्या लूकबरोबरच त्याच्या लांब दाढीतील लूकचीही प्रशंसा होत आहे. 


आता क्लीन शेवसह आमिरचा एक नवा लूक समोर आला आहे. या लूकमुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता अधिकच वाढली आहे. 


‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.
लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटात आणीबाणीपासून, कारगिल युद्ध, पुलवामा हमला, उरी हमला, तेव्हापासून आतापर्यंत बदललेली अनेक सरकारं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात आमिरसोबत करीना कपूरसुद्धा दिसणार आहेत. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहे.


लाल सिंग चड्ढा चित्रपटातून आमिर खान दोन वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. शेवटचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये झळकला होता. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Aamir Khan will be seen in three different looks in Laal Singh Chhaddha film, see his look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.