ठळक मुद्दे आमिर खानच्या केवळ एका शब्दावर साजिद नाडियाडवाला आणि अक्षय कुमार यांनी बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर दोन बड्या बजेटचे चित्रपट अनेकवेळा प्रदर्शित होतात. पण या मुळे दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे सध्या अनेक निर्माते एकाच दिवशी दोन बड्या बजेटचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर न आणता आपल्या चित्रपटांची प्रदर्शनाची तारीख बदलताना दिसतात. आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा बच्चन पांडे हे दोन्ही चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होते. पण आता दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिवर क्लॅश होऊ नयेत यासाठी अक्षयने त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे.

आमिर खानच्या केवळ एका शब्दावर साजिद नाडियाडवाला आणि अक्षय कुमार यांनी बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा चित्रपट 22 जानेवारी 2021 ला प्रदर्शित होणार आहे. अक्षय आणि साजिदने घेतलेल्या या निर्णयाबाबत आमिरने सोशल मीडियाद्वारे त्यांचे आभार मानले आहेत. आमिरने ट्वीट करत लिहिले आहे की, कधीकधी एक संभाषणच पुरेसे असते. माझ्या विनंतीवरून बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याबाबत अक्षय कुमार आणि साजिद नाडियाडवाला या माझ्या मित्रांचे खूप सारे आभार... त्यांच्या चित्रपटासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा...

आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवला जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटात आणीबाणीपासून, कारगिल युद्ध, पुलवामा हमला, उरी हमला, तेव्हापासून आतापर्यंत बदललेली अनेक सरकारं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात आमिरसोबत करिना कपूरसुद्धा दिसणार आहे.

बच्चन पांडे या चित्रपटात अक्षयचा एक वेगळा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील अक्षयचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Web Title: Aamir Khan thanks Akshay Kumar for moving the release date of ‘Bachchan Pandey; ‘Laal Singh Chaddha’ to enjoy solo Christmas 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.