ठळक मुद्देआमिर खानने रिंकूला सल्ला देताना सांगितले होते की, आपण कितीही प्रसिद्ध झालो तरी कधीही त्या प्रसिद्धीने भारावून जायचे नाही.

आमिर खानच्या जादूने कोण मंत्रमुग्ध होत नाही? खरं आहे, प्रत्येक जण होतोच! पण, कल्पना करा मिस्टर परफेक्शनिस्ट तुम्हाला सल्ला देतोय... त्याचा सल्ला ऐकून तुम्ही प्रचंड भारावून जाल, यात काही शंकाच नाही. हो आणि हेच घडलं आपल्या सैराट अभिनेत्री रिंकू राजगुरुसोबत.

आमिर खानने रिंकूला सल्ला देताना सांगितले होते की, आपण कितीही प्रसिद्ध झालो तरी कधीही त्या प्रसिद्धीने भारावून जायचे नाही. आमिरचा हा सल्ला रिंकूसाठी लाखमोलाचा असल्याचे ती सांगते. रिंकूने फेमसली फिल्मफेअरला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,  "आमिर खान यांच्याशी बोलताना माझ्याकडे शब्दच नव्हते. त्यांच्या प्रश्नांना काय उत्तरं देऊ हेच मला कळत नव्हतं. पण मी हिंमत एकवटून त्यांच्याशी बोलले. मला त्यांना भेटल्यानंतर किती छान वाटलं हे मी शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. तसेच माझ्याशी बोलताना त्यांनी मला एक खूप छान सल्ला दिला. ते म्हणाले, कितीही प्रसिद्धी मिळाली तरी त्याने भारावून जायचं नाही. मी एका छोट्याशा गावातून आलेय. पण मला प्रेक्षकांना डोक्यावर घेतले. पण मी यापुढे देखील खूप मेहनत घेतली पाहिजे. तसेच प्रामाणिकपणे आणि व्यावसायिक पद्धतीने वागलं पाहिजे असेही त्यांनी मला सांगितले.

रिंकू राजगुरूचाकागर हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण, आजच्या समाजकारणाचे वास्तववादी चित्रण करणाऱ्या आणि ‘कागर’ या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि अभिनेता शुभंकर तावडे ही नवी जोडगोळी रसिकांच्या भेटीस आली असून प्रेक्षकांना ही जोडी आवडत आहे.

परिस्थितीच्या वेगवेगळ्या कसोट्यांवर नात्यांची वीण घट्ट बांधून ठेवतं ते प्रेम आणि नात्यातल्या विश्वासाला वैयक्तिक स्वाथार्साठी उपयोगात आणतं ते राजकारण. एकीकडे हळूवार प्रेम आणि दुसरीकडे राजकारणाचा पट मांडणारा आणि वास्तवाला थेट जाऊन भिडणारा ‘कागर’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात राजकारण, शेतकऱ्यांचे प्रश्न, लव्हस्टोरी, शेती हे सगळं प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 


Web Title: Aamir Khan has given this advice to sairat fame Rinku Rajguru
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.