aamir khan had removed this emotional scene of sushant singh rajput and anushka sharma from the film pk | ‘पीके’तील हा Deleted Scene पाहून संतापले सुशांतचे फॅन्स; उत्तर द्या, म्हणत काढली भडास

‘पीके’तील हा Deleted Scene पाहून संतापले सुशांतचे फॅन्स; उत्तर द्या, म्हणत काढली भडास

ठळक मुद्देसुशांतने राजकुमार हिरानीच्या या सिनेमात काम करण्यासाठी मानधन घेण्यास नकार दिला होता.

आमिर खानच्या ‘पीके’ या चित्रपटाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक वेगळा ठसा उमटला होता, 2014 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या कमाईचा आकडा पाहून सर्वांचे डोळे पांढरे झाले होते. सध्या हा चित्रपट पुन्हा चर्चेत आहे, कारण काय तर सुशांत सिंग राजपूत.
होय,  ‘पीके’ या चित्रपटाने देशाच्या सीमा ओलांडून सुशांतसिंगला सरफराज नावाच्या एका पाकिस्तानी तरुणाच्या भूमिकेत सादर केले होते. जग्गू (अनुष्का शर्मा) ही भारतीय हिंदू मुलगी सरफराजच्या प्रेमात पडते, असे या सिनेमात दाखवण्यात आले होते. सुशांत व अनुष्काची जोडी  लोकांना प्रचंड भावली होती. सुशांतच्या निधनानंतर आता ‘पीके’ या चित्रपटातील एक सीन व्हायरल होतोय. हा सीन चित्रपटात नव्हता. कारण प्रदर्शनाआधी तो एडिट करण्यात आला होता. या सीनमध्ये अनुष्का व सुशांत पीकेबद्दल बोलताना दिसत आहेत़. पीकेबद्दल बोलताना दोघेही इमोशनल होताना यात दिसतात.
‘पीके’तील हा डिलिटेड सीन समोर आल्यानंतर सुशांत सिंगचे चाहते आमिर खानराजकुमार हिरानी यांच्यावर संतापलेले आहेत.

डिलिटेड सीन होतोय व्हायरल
‘पीके’ सिनेमातील हा डिलिटेड सीन सध्या प्रचंड व्हायरल होतोय. नेटक-यांनी यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुशांतच्या बेस्ट परफॉर्मन्सपैकी हा एक बेस्ट परफॉर्मन्स होता. पण हा सीन ‘पीके’मधून गाळण्यात आला, का माहित नाही, असे एका युजरने यावर प्रतिक्रिया देताना लिहिले आहे.

अन्य एका युजरने यानिमित्ताने आमिर खानला लक्ष्य केले आहे. हा सीन पाहून आमिर खानला असुरक्षित वाटले असावे, याचमुळे त्याने हा सीन काढून टाकला, असे या युजरने लिहिले आहे.


एका युजरने तर चक्क राजकुमार हिरानी यां ना जाब विचारला आहे. सुशांतचा हा सीन चित्रपटातून का काढला, राजकुमार हिरानी यांनी याचे उत्तर द्यावे, असे या युजरने म्हटले आहे.

सुशांतचा हा सीन चित्रपटात असता तर त्याने सगळ्यांना जिंकले असते. सिनीअर अ‍ॅक्टरला याबद्दल असुरक्षित वाटले असावे. आमिरला फक्त लोकांनी त्याचे कौतुक करावे असे वाटते,  असे एका युजरने यावर प्रतिक्रिया देताना लिहिले आहे.

घेतले होते फक्त 20 रूपये 
सुशांतने राजकुमार हिरानीच्या या सिनेमात काम करण्यासाठी मानधन घेण्यास नकार दिला होता. राजकुमार हिरानींसोबत काम करणे सुशांतसाठी एका स्वप्नपूर्तीसारखे होते. त्यामुळेच त्याने यासाठी मानधन घेण्यास नकार दिला होता. राजकुमार हिरानींनी आग्रहाने फी म्हणून सुशांतला 20 रूपये दिले होते.

Shocking!! 13 जूनच्या रात्री ‘डार्क वेब’द्वारे झाले होते सुशांतच्या हत्येचे लाईव्ह टेलिकास्ट?

  कमावले होते इतके कोटी
‘पीके’ या सिनेमाने पहिल्याच दिवशी 26 कोटींचा बिझनेस केला होता. या सिनेमाचा लाईफटाइम बिझनेस 340 कोटींपेक्षा अधिक आहे. रिलीज झाल्यानंतर काहीच दिवसांत या सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले होते.

आमिर खानच्या संपर्कात होती रिया चक्रवती, इतक्या वेळा केले फोन आणि मेसेज

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: aamir khan had removed this emotional scene of sushant singh rajput and anushka sharma from the film pk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.