Shocking ! आमिर खानच्या संपर्कात होती रिया चक्रवती, इतक्या वेळा केले फोन आणि मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:41 AM2020-08-12T11:41:04+5:302020-08-12T11:41:31+5:30

नुकताच विवाह बंधनात अडकलेल्या राणा दग्गुबतीच्या संपर्कात पण रिया होती.

Rhea chakraborty called aamir khan 3times lets check report | Shocking ! आमिर खानच्या संपर्कात होती रिया चक्रवती, इतक्या वेळा केले फोन आणि मेसेज

Shocking ! आमिर खानच्या संपर्कात होती रिया चक्रवती, इतक्या वेळा केले फोन आणि मेसेज

googlenewsNext

रिया चक्रवर्तीच्या कॉल रेकॉर्डवरून बरीच माहिती समोर येत आहे. कॉल रेकॉर्डवरून असे कळतेय की रिया आमिर खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, आदित्य रॉय कपूर, राणा डग्गुबाती, सनी सिंग आणि दिवंगत कोरियोग्राफर सरोज खान यांच्या संपर्कात होती. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी सीबीआय आणि ईडी करते आहे.सुशांतचे वडील के. के. सिंग यांनी बिहार पोलिसांत रियावर विविध आरोप केले गेले आहेत, त्या आधारे तिची चौकशी करत आहेत.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, रियाच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डनुसार तिने एकदा आमिर खानला फोन केला आणि त्यानंतर त्याने तिला तीन एसएमएस पाठवले होते. सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणात बॉलिवूडमधील तीन खान (सलमान, शाहरुख आणि आमिर) यांनी आतापर्यंत मौन बाळगल्याने टीकेची झोड उठली होती त्यात आता आमिर खानचे नाव रियाच्या कॉल रेकॉर्डमध्ये सापडले आहे.

रिपोर्टनुसार रियाने अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला 30 वेळा कॉल केला होता तर रकुलने रियाला 14 वेळा कॉल केला होता. 
रियाने आदित्य रॉय कपूरला 16 वेळा कॉल केला होता, आदित्यने तिला 7 वेळा कॉल केला होता. रियाने श्रद्धा कपूरला पण कॉल केले होते तर श्रद्धाने ही 2 वेळा रियाला कॉल केला होता. रिया अभिनेता सनी सिंगच्या देखील संपर्कात होते. नुकताच विवाह बंधनात अडकलेल्या राणा दग्गुबतीच्या संपर्कात पण रिया होती. रियाने  राणाला 7 वेळा फोन केला होता तर त्याने रियाला 4 वेळा फोन केला होता.   

ईडीने रिया, तिच्या कुटुंबियांसह आणि त्यांच्याशी संबंधित अनेक लोकांची चौकशी केली. सीबीआयाने सुशांतची मोठी बहीण राणी सिंगचा जबाब देखील नोंदवला आहे.  
 

Web Title: Rhea chakraborty called aamir khan 3times lets check report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.