बॉलिवूडचा बाजीराव म्हणजे रणवीर सिंग लवकरच ८३ चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात तो क्रिकेटर कपिल देवची भूमिका साकारणार आहे. कपिल देव यांचा वाढदिवस नुकताच पार पडला. यानिमित्ताने चित्रपट निर्मात्यांनी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात या महान खेळाडूचा सन्मान करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये '८३' चित्रपटातील कपिल यांना चिअर करतानाचा सीनही दाखवण्यात आला आहे.

'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. हा सिनेमा १० एप्रिल २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंग चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील रणवीरच्या लुक्सचं सर्वत्र कौतुक होत आहे. रणवीरनेही कपिल देव यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

चित्रपटातील रणवीरच्या लुक्सबाबत कपिल देव यांनी एका न्यूज एजेन्सीशी बोलताना, रणवीरचा लूक पाहून अतिशय आश्चर्यचकित झालो असल्याचं सांगितलं. कपिल देव यांनी मेकअप आर्टिस्टचं कौतुक करत, त्यांनी अतिशय उत्तम काम केल्याची दाद दिली आहे.

रणवीरबाबतही बोलताना कपिल यांनी रणवीरसोबत बराच वेळ घालवला असून तो माझ्याहून अतिशय वेगळा व्यक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.


८३ चित्रपटात रणवीरसोबत चित्रपटात दीपिका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

कबीर खान दिग्दर्शित '८३' येत्या १० एप्रिल २०२० मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: '83' Movie team give tribute to Kapil Dev , watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.