हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाला नुकतीच २२ वर्षं पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं हिंदी चित्रपटसृष्टीसह रसिकांमध्येही याच्या आठवणी जागवल्या जात आहेत. शाहरूख खान, काजाले, रानी मुखर्जी यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात सलमान खानने गेस्ट अपिअरन्स दिला होता.

आजही या कलाकारांनी साकारलेल्या भूमिका  रसिकांच्या मनात घर करून आहेत. या चित्रपटात राहुल आणि अंजलीची जोडी लोकांना खूप आवडली होती. त्यासोबतच दोघांची लव्हस्टोरी, चित्रपटातील गाणी आणि त्यावरील डान्स लोकांना विशेष आवडला. चित्रपटाला २२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काजोलनेही तिच्या खास आठवणी जागवल्या आहेत.

काजोलने सोशल नेटवर्किंग साइटवर चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देत राहुल आणि अंजलीचे कार्टुन शेअर करुन त्याला #22YearsOfAnjali #KKHHmemories हे हॅशटॅग दिले आहेत.


'कुछ कुछ होता है'मधील छोटी अंजली २१ वर्षांनंतर आता दिसते अशी, बोल्ड अदा पाहून तिच्यावर व्हाल फिदा

या चित्रपटात शाहरूखची मुलगी अंजलीनेही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या चित्रपटात चुलबुली अंजलीची भूमिका सना सईदने साकारली होती. २२ सप्टेंबर, १९८८ साली मुंबईत जन्माला आलेली सना सईद आता खूप बदलली आहे. 'कुछ कुछ होता है'मध्ये बालकलाकार म्हणून झळकलेल्या सना सईदचं खूप कौतूक झालं. या चित्रपटानंतर ती २००० साली 'बादल' व 'हर दिल जो प्यार करेगा' चित्रपटात झळकली होती. या चित्रपटानंतर सना बराच काळ रुपेरी पडद्यावर दिसली नाही. चित्रपटांव्यतिरिक्त सना सईदने टेलिव्हिजनवरील मालिकेत काम केले आहे. 'बाबुल का आंगन छूटे ना', 'लो हो गई पूजा इस घर की', 'कॉमेडी सर्कस' व 'लाल इश्क' या मालिकेत तिने काम केले आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 22 Years Of Kuch Kuch Hota Hai Kajol Shares Special Cartoons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.