१९९८ साली प्रदर्शित झालेला शाहरूख खान, काजोलराणी मुखर्जी यांच्या अभिनयानं सजलेला चित्रपट 'कुछ कुछ होता है'ला नुकतेच २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. या चित्रपटात तिघांव्यतिरिक्त शाहरूखची मुलगी अंजलीनेही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या चित्रपटात चुलबुली अंजलीची भूमिका सना सईदने साकारली होती. २२ सप्टेंबर, १९८८ साली मुंबईत जन्माला आलेली सना सईद आता खूप बदलली आहे.

'कुछ कुछ होता है'मध्ये बालकलाकार म्हणून झळकलेल्या सना सईदचं खूप कौतूक झालं. या चित्रपटानंतर ती २००० साली 'बादल' व  'हर दिल जो प्यार करेगा' चित्रपटात झळकली होती. या चित्रपटानंतर सना बराच काळ रुपेरी पडद्यावर दिसली नाही. 


चित्रपटांव्यतिरिक्त सना सईदने टेलिव्हिजनवरील मालिकेत काम केले आहे.  'बाबुल का आंगन छूटे ना', 'लो हो गई पूजा इस घर की', 'कॉमेडी सर्कस' व  'लाल इश्क' या मालिकेत तिने काम केले आहे.

तसेच ती  'झलक दिखला जा ६', 'झलक दिखला जा ७', 'नच बलिए ७' आणि 'झलक दिखना जा ९' या रिएलिटी शोमध्येदेखील दिसली होती.


२०१२ साली प्रदर्शित झालेला करण जोहरचा चित्रपट स्टुडंट ऑफ द ईयरमध्ये सना झळकली होती. या चित्रपटातील तिच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते घायाळ झाले होते. या चित्रपटात वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


सना सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंना खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो.

तिचे ६ लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.

Web Title: Sana Saeed Kuch Kuch Hota Hai Anjali Transformation Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.