उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर २ कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. तिचा आगामी 'पागलपंती' या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. आता ही ग्लॅमरस अभिनेत्री अत्यंत आकर्षक भूमिकेत दिसणार असून प्रेक्षकांना खूप हसवणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या एकाच चित्रपटात उर्वशी तीन भूमिका पार पाडताना दिसत आहे. आता पागलपंती चित्रपटाच्या माध्यमातून ती आपले नशीब आजमावणार आहे.

या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल आणि उत्साहाने उर्वशी म्हणाली, ''पागलपंती या चित्रपटाचा भाग झाल्याचा मला खूप आनंद होत आहे. यापूर्वी मी विनोदी शैलीमध्ये प्रयोग केले असले तरीही, माझ्या ग्लॅमरस भूमिकांबद्दलच मी प्रसिद्ध आहे. या चित्रपटातून माझी विनोदी बाजू समोर येणार असल्याचा मला विश्वास वाटत असून प्रेक्षकांना माझा हा नवीन अवतार नक्की आवडेल. 

 मल्टी-स्टारर पागलपंती या चित्रपटात उर्वशी रौतेलासोबत जॉन अब्राहमसारखे अन्य गुणी कलाकार सहभागी आहेत. अनीझ बाझमी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर २२ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.'' 

इतकेच नव्हे तर, उर्वशीने 'बिजली की तार' या टोनी कक्करच्या क्लब गाण्यातही आपल्या अभिनयाची व नृत्याची चुणूक दाखवली आहे. आपल्या उत्तम नर्तन कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्‍या उर्वशीने या गाण्यातही आकर्षक नृत्य सादर केले आहे. सनम रे, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती आणि हृतिक रोशनचा २०१७चा काबिल या चित्रपटांत ऊर्वशी यापूर्वी दिसली होती. ती म्हणाली, ''मला माझा स्वतःचा मार्ग तयार करायला आवडते. मी आजवर हेच शिकले आहे.'' 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 2 cored fans of urvashi rautela on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.