Ganesh Chaturthi 2023: प्रतीक्षा संपली! पुढच्या मंगळवारी अंगारकीच्या मुहूर्तावर बाप्पा घरी येणार; वाचा या मुहूर्ताचे वैशिष्ट्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 06:30 AM2023-09-12T06:30:02+5:302023-09-12T06:35:02+5:30

Ganesh Chaturthi 2023: यंदा गणेश चतुर्थीला अंगारक योग जुळून आल्याने या दिवसाचे महत्त्व चौपटीने वाढले आहे, पण असे का? सविस्तर वाचा. 

Ganesh Chaturthi 2023: The Wait is Over! Bappa will come home next Tuesday on the occasion of Angaraki; Read the feature of this Muhurta! | Ganesh Chaturthi 2023: प्रतीक्षा संपली! पुढच्या मंगळवारी अंगारकीच्या मुहूर्तावर बाप्पा घरी येणार; वाचा या मुहूर्ताचे वैशिष्ट्य!

Ganesh Chaturthi 2023: प्रतीक्षा संपली! पुढच्या मंगळवारी अंगारकीच्या मुहूर्तावर बाप्पा घरी येणार; वाचा या मुहूर्ताचे वैशिष्ट्य!

googlenewsNext

यंदा गणेश उत्सव १९ सप्टेंबर रोजी सुरू होणार असून बाप्पा आपल्याबरोबर अत्यंत शुभ असा अंगारक योग घेऊन आलेत, नव्हे तर अंगारक मुहूर्तावर ते आपल्या घरी आगमन करणार आहेत. 

श्रीगणेश चतुर्थीला अंगारक योग

मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षातील चतुर्थी गणेशाला समर्पित असून, या दिवशी अनुक्रमे विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. मात्र, चतुर्थी तिथी मंगळवारी आली की, अंगारक योग जुळून येतो. म्हणून याला अंगारकी चतुर्थी किंवा अंगारक चतुर्थी असे म्हटले जाते. यंदा सन २०२३ मध्ये मंगळवारी श्रीगणेश चतुर्थी येत आहे. त्यामुळे या दिवशी अंगारक योग जुळून आले आहे. 

या योगाबद्दल गणेश पुराण किंवा मुद्गल पुराणात अंगारकी चतुर्थीबद्दल कथा सांगितली जाते, ती अशी- 

अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की 'माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! 

अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. जर खुद्द गणरायाने मंगळावर कृपादृष्टी केली, तर तुम्हीआम्ही त्याच्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची काहीच गरज नाही! मंगळाची धास्ती न बाळगता आपलेही जीवन मंगलमय व्हावे अशी प्रार्थना या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने करता येईल. 

सर्व शास्त्रांमध्ये पारंगत असलेल्या गणपतीने दूर्वांचे आयुर्वेदातील महत्त्व ओळखून त्यांना जवळ केले. अंगारकीच्या निमित्ताने आपलाही त्यांच्याशी क्षणिक संबंध येतो. त्यांचे महत्व जाणून तो संबंध आपण वाढवायचा असतो. अथर्वशीर्षात गणेशस्तुती केलेली असली, तरी त्याचे पारायण केल्यामुळे  आपली भाषाशुद्धी होते. भाषा शुद्ध झाली की विचार आणि आचारही शुद्ध होतात. मनुष्याची अंतर्बाह्य शुद्धी झाली की त्याच्या कामाचा श्रीगणेशा होतो आणि कामांनाही गती येते. एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या चतुर्थीने साध्य होतात, म्हणून तिचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे! आणि या मुहूर्तावर बाप्पाचे आगमन झाल्याने हा दुग्ध शर्करा योगच जुळून आला आहे असे म्हणता येईल! बाप्पा मोरया!

श्रीगणेश चतुर्थी: यंदा अद्भूत अंगारक योग; गणपती कधी बसवावे? जाणून घ्या, सविस्तर

Web Title: Ganesh Chaturthi 2023: The Wait is Over! Bappa will come home next Tuesday on the occasion of Angaraki; Read the feature of this Muhurta!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.