निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 16:49 IST2024-11-20T16:41:07+5:302024-11-20T16:49:34+5:30

बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला

Independent candidate Balasaheb Shinde dies of heart attack at polling station in Beed | निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना

निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना

बीड: बीड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. बाळासाहेब शिंदे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे थांबले होते. अचानक त्यांना भोवळ आली. त्यानंतर शिंदे यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, शिंदे यांच्यावर शिंदेनगर येथील शेतामध्ये संध्याकाळी अंत्यविधी होणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Independent candidate Balasaheb Shinde dies of heart attack at polling station in Beed