Beed Lok Sabha Election 2024 : 'बीडमध्ये घर बांधणार, पण वर्गणी द्या...'; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 11:57 PM2024-04-08T23:57:42+5:302024-04-08T23:59:11+5:30

Beed Lok Sabha Election 2024 : बीडमध्ये भाजपाने पंकजा मुंडे यांनी उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने बजरंग सोनावणे यांना मैदानात उतरवले आहे.

Beed Lok Sabha Election 2024 Will build house in Beed but give subscription Pankaja Munde's appeal to BJP workers | Beed Lok Sabha Election 2024 : 'बीडमध्ये घर बांधणार, पण वर्गणी द्या...'; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Beed Lok Sabha Election 2024 : 'बीडमध्ये घर बांधणार, पण वर्गणी द्या...'; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

बीडमध्ये  भाजपानेपंकजा मुंडे यांनी उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने  बजरंग सोनावणे यांना मैदानात उतरवले आहे. पंकजा मुंडे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. आज मुंडे यांनी बीडमध्ये प्रचारसभा घेतली. या सभेत भाजपा नेत्या पंकडा मुंडे यांनी  'बीडमध्ये घर बांधणार असल्याचे जाहीर केले, या घरासाठी वर्गणी काढण्याचे आव्हानही केले. 

"मी बीडमध्ये घर बांधण्यासाठी सुरुवात करणार आहे, माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही सगळ्यांनी वर्गणी करुन मी घर बांधते. ते घर तुमच्याच नावावर करते, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. " त्यांनंतर मी मरेपर्यंत बीडमध्ये राहीनं, आपण आपण बीडमध्ये छान घर बांधू. आष्टी, गेवराई आणि बीड मतदारसंघात कामं असतील तेव्हा मी बीडमधल्या घरात राहीन तर केज, माजलगाव आणि परळी मतदारसंघात कामं असतील तेव्हा मी परळीत मुक्काम करेन, असंही मुंडे म्हणाल्या. 

मी सर्व कार्यकर्त्यांना शब्द देते. या घरांमध्ये राहीन आणि येथूनच तुमच्याबरोबर संपर्कात राहीन. मी सर्व कार्यकर्त्यांना शब्द देतेय, मतदारांना नाही. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठी इथे राहण्याचा माझा मानस आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.  

बजरंग सोनवणेंना शुभेच्छा

 भाजपाने बीडमधून पंकजा मुंडेंना लोकसभेच्या मैदानात उतरवल्यानंतर महाविकास आघाडीनेही गतवर्षीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना तिकीट दिलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे यांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे, ज्योती मेटे महाविकास आघाडीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत. मात्र, त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्याच्या हाललाचील सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. याच अनुषंगाने भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, तो त्यांचा विषय आहे. त्यांचे अनुयायी आणि ज्योती मेटेच याबाबत निर्णय घेतील, असे पंकजा यांनी म्हटले. 

बीडमध्ये २०१९ साली असे झाले मतदान 

दरम्यान, गत २०१९ च्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना ६ लाख ७८ हजार १७५ मते तर बजरंग सोनवणे यांना ५ लाख ९ हजार १०८ मते मिळाली. तर, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव हे ९१ हजार ९७२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.

Web Title: Beed Lok Sabha Election 2024 Will build house in Beed but give subscription Pankaja Munde's appeal to BJP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.