Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ३० मे २०२३; आपले कोण अन परके कोण, हे ओळखता आले पाहिजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 07:51 IST2023-05-30T07:40:46+5:302023-05-30T07:51:02+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ३० मे २०२३; आपले कोण अन परके कोण, हे ओळखता आले पाहिजे
मेष- नोकरीत नवनवीन कामे समोर दत्त म्हणून उभी राहतील. सहकारी वर्गाची म्हणावी तशी साथ मिळणार नाही. मात्र आपण मुत्सद्दीपणाने वागून त्यातून मार्ग काढाल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलणे ठीक राहील.
वृषभ - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील, समाजात तुमचा गौरव होईल. काहींना प्रवास घडून येईल. मुलांना योग्य संधी मिळतील. नोकरीत तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील.
मिथुन - कामात खात्यांतर्गत बदल होतील. नवीन कामांसाठी वेळ द्यावा लागेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील.
कर्क - घरात लगबग राहील. घरातील कामासाठी वेळ द्यावा लागेल. घरातील सदस्य तुम्हाला चांगली साथ देतील. जोडीदाराच्या भावनांची कदर करा. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. व्यवसायात भरभराट होईल. मालाची विक्री चांगली होईल. सतत कार्यरत राहाल.
सिंह - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. त्यामुळे फार काही अडचणी न येता कामे मार्गी लागतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. प्रभावशाली लोकांची चांगली मदत होईल. मनासारखे भोजन मिळेल.
कन्या- आपले महत्त्वाचे प्रकल्प गती घेतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांचे चांगले सहकार्य मिळेल. मात्र जवळचे कोण आणि दूरचे कोण हे ओळखायला हवे. काही लोक गोड बोलून तुमचा गैरफायदा घेतील. जोडीदाराचा सल्ला महत्वाचा ठरेल.
तूळ - महत्त्वाची कामे थोडी पुढे ढकलणे ठीक राहील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. ते तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही सावधपणे व्यवहार केले तर त्यांची मात्रा चालणार नाही. नोकरीत आघाडीवर राहाल. अनावश्यक खर्च टाळा.
वृश्चिक - आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता प्राप्त होईल. झटपट कामे करून टाकण्याचा प्रयत्न राहील. जवळच्या लोकांची चांगली मदत होईल. विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. काही अचानक फायदे होतील. मनात आनंदी विचार राहतील.
धनू - प्रलंबित कामे पूर्ण होतील. त्यामुळे मनावरील ताण निघून जाईल. स्वतः साठी व कुटुंबातील सदस्यासाठी वेळ देणे शक्य होईल. मन प्रसन्न राहील. नावीन्यपूर्ण कल्पना विकसित केल्या जातील. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. सावधपणे व्यवहार करा.
मकर - चांगल्या बातम्या कानावर पडतील. नशिबाचा कॉल तुमच्या बाजूने राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल, एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. तुमच्या नावलौकिकात भर पडणान्या घटना घडतील. तुमची प्रशंसा होईल.
कुंभ - महत्वाची कामे पुढे ढकलणे ठीक राहील. त्यामुळे तुमचा अतिरिक्त पैसा खर्च होणार नाही. संयमाने वागण्याची गरज आहे. फार दगदग करू नका. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील.
मीन - ग्रहमानाची साथ तुम्हाला राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या उपयोगी पडाल. विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. कुटुंबीयांच्या सुखसोयीत तडजोड करू नका.