Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०५ जानेवारी २०२३: प्रत्येक कामात सुयश, व्यापारात फायदा; आर्थिक लाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-01-05 07:02:51 | Updated: January 5, 2023 07:02 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आजचा दिवस खर्चाचा असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाण करताना सावध राहावे लागेल. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आप्तेष्टांशी मतभेद होण्याची व आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. एकंदरीत आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक व कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. त्यामुळे मन लावून काम कराल. आर्थिक जवाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आर्थिक आयोजन कराल. अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजन ह्यावर खर्च कराल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे तणावग्रस्त राहील. कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा. आपले बोलणे किंवा व्यवहार ह्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आज आपला खर्च अधिक होईल. मानसिक चिंतेने मन त्रस्त होईल. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस आपणासाठी लाभदायी आहे. उत्पन्न वाढेल. आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. व्यापारात फायदा होईल. आनंददायी बातमी मिळेल. चिंता दूर होतील. मित्रांसह एखाद्या नैसर्गिक स्थळी जाण्याची योजना आखाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आणखी वाचा 

सिंह: खंबीर मन व दृढ निश्चय ह्यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. पैतृक संपत्तीपासून लाभ होईल. कला व क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींना कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. धनाच्या दृष्टीने सरकारी कामे सफल होतील. आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धर्मिक कार्य व प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व संबंधीतांशी होणार्‍या चर्चेमुळे आनंद होईल. विदेशातील स्नेह्यांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांमुळे आर्थिक फायदा होईल. आणखी वाचा 

तूळ: आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. सरकार विरोधी कामे, राग इत्यादींपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन संबंध जुळवू नये. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करून आनंद - प्रमादात आपण व्यस्त राहाल. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन मन प्रसन्न होईल. समाजात मान - सन्मान होतील. मित्र व कुटुंबियांशी हिंडणे - फिरणे आनंददायी ठरेल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल. त्यामुळे मन आनंदी राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्यवसायात लाभ होईल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. आणखी वाचा 

मकर: आज आपले मन चिंतातुर व द्विधा अवस्थेत राहील. कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. नशिबाची साथ नसल्याने आज कोणतेही महत्वाचे काम न करणे हितावह राहील. कार्यालयात वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च होतील. आणखी वाचा 

कुंभ: आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. मनात एखादी आर्थिक योजना आखाल. मातेकडून लाभाची शक्यता आहे. जमीन, घर व वाहन इत्यादींचे व्यवहार काळजी पूर्वक करावेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूलता लाभेल. कोणत्याही गोष्टीत हट्टीपणा करू नका. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस शुभ आहे. मित्रांसह छोटीशी सहल आयोजित कराल. भावंडां कडून लाभ होईल. कार्यात यश मिळेल. मान- सम्मान होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App