Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, ०२ एप्रिल २०२६: स्वादिष्ट भोजन, भेटवस्तू, यश-लाभ; पण वाद टाळा

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-04-02 06:44:372026-04-02 06:54:48 | Updated: 2026-04-02 06:54:48

Today Daily Horoscope 02 April 2026: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल असून आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. उत्साह अनुभवाल. मित्र व स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. आनंदात वेळ जाईल. एखाद्या समारंभास किंवा सहलीस जाऊ शकाल. सद्भावनेने केलेले परोपकारी काम मनाला आत्मिक आनंद देईल. आणखी वाचा 

वृषभ: आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन आपला फायदा होईल. मधुर व सौम्य भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. मंगल कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन - लेखन ह्या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असले तरीही आपली कामातील तत्परता व कुशलता प्रगतीस सहाय्यक होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करू शकतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभू शकेल. आणखी वाचा 

मिथुन: द्विधा अवस्थेतील आपले मन महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अधिकतम हळवेपणा आपल्या दृढतेला कमकुवत करेल. कुटुंब किंवा जमीन ह्या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळा. शारीरिक व मानसिक स्वस्थतेचा अभाव राहील. आणखी वाचा 

कर्क: आज भावंडांकडून लाभ होतील. मित्र व स्वकीयांच्या सहवासाचा आनंद लाभेल. रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भावनेला प्राधान्य दिल्याने संबंध सुखद होतील. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक व आर्थिक सन्मान होतील. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस कुटुंबियासह सुखात घालवाल. सहकार्य मिळेल. मित्रांकडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही ह्यांच्याशी साधलेला संपर्क फायदेशीर ठरेल. प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश कमीच मिळेल. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस लाभदायी आहे. वैचारिक समृद्धी वाढेल. मैत्रीपूर्ण संबंध विकसित करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, जीवन साथीचा सहवास व सहल - प्रवास ह्यामुळे दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा 

तूळ: आज थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत टाकेल. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे ह्यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. शारीरिक व मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा 

वृश्चिक: आज नोकरी - व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांसह गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नीकडून लाभ होईल. वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. भेटवस्तू मिळतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. . वैवाहिक जीवनात मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा 

धनु: आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सरकारकडून फायदा मिळेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. व्यापारासाठी प्रवास होऊ शकतो. इतर लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. शारीरिक थकवा जाणवेल. संततीच्या समस्या आपणास त्रस्त करतील. व्यर्थ खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. आणखी वाचा 

कुंभ: आज अवैध कृत्यांपासून दूर राहावे. वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती व वस्तू ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाल. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण जाणवेल. क्रोधावर संयम ठेवा. शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वास्थ्य राहील. आणखी वाचा 

मीन: आज आपण दैनंदिन कामातून बाहेर पडून सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलाकार किंवा कारागिराना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. आजचा दिवस व्यवसायात भागीदारीसाठी अनुकूल आहे. दांपत्य जीवनात अधिक जवळीक निर्माण करता येऊ शकेल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होतील. आणखी वाचा 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Horoscope April 2, 2026: Delicious food, gifts, success; avoid arguments.

Web Summary : Aries benefits financially. Taurus gains through speech. Gemini feels mentally unstable. Cancer enjoys success. Leo spends more. Virgo experiences happiness. Libra faces difficulties. Scorpio has opportunities. Sagittarius achieves recognition. Capricorn faces challenges. Aquarius avoids conflict. Pisces enjoys entertainment.
Web Title : राशिफल 2 अप्रैल, 2026: स्वादिष्ट भोजन, उपहार, सफलता; विवादों से बचें।

Web Summary : मेष राशि वालों को आर्थिक लाभ। वृषभ राशि वाले वाणी से लाभान्वित होंगे। मिथुन राशि वाले मानसिक रूप से अस्थिर महसूस करेंगे। कर्क राशि वाले सफलता का आनंद लेंगे। सिंह राशि वाले अधिक खर्च करेंगे। कन्या राशि वाले खुशी का अनुभव करेंगे। तुला राशि वाले कठिनाइयों का सामना करेंगे। वृश्चिक राशि वालों के पास अवसर हैं। धनु राशि वाले पहचान प्राप्त करेंगे। मकर राशि वालों को चुनौतियों का सामना करना पड़ेगा। कुंभ राशि वाले संघर्ष से बचें। मीन राशि वाले मनोरंजन का आनंद लेंगे।
टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्यअध्यात्मिकहनुमान जयंती
Open in App