चंद्र आज 15 ऑक्टोबर, 2025 बुधवारी कर्क राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज आपण वाणी व संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे प्रकृती खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. धन खर्च वाढेल. निषेधार्ह व अवैध कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा.