02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आज आपण दैनंदिन कामातून बाहेर पडून सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहली साठी जाऊ शकाल. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलाकार किंवा कारागिराना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. आजचा दिवस व्यवसायात भागीदारीसाठी अनुकूल आहे. दांपत्य जीवनात अधिक जवळीक निर्माण करता येऊ शकेल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होतील.