आज चंद्र रास बदलून 18 नोव्हेंबर, 2025 मंगळवार च्या दिवशी तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक व कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. विधायक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आर्थिक योजना ठरवाल. प्रिय व्यक्तीसह दिवस आनंदात घालवू शकाल. अलंकार, मनोरंजन, आनंद इत्यादींसाठी पैसा खर्च होईल.