आजचे राशीभविष्य: या राशींना आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले; नोकरीत चांगली परिस्थिती राहील
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 07:29 IST2023-08-03T07:28:44+5:302023-08-03T07:29:27+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य: या राशींना आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले; नोकरीत चांगली परिस्थिती राहील
मेष - महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल; पण त्यासाठी तुम्हाला बरेच प्रयत्न करावे लागतील. कागदोपत्री नोंदी ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. आर्थिक देवाणघेवाण थोडी जपून करा. नोकरीत चांगली परिस्थिती राहील.
वृषभ- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. नवीन प्रयोग करून पाहिले जातील. नोकरीत बदलीची शक्यता आहे. आर्थिक फायदे होतील. कामातील बदल दमछाक करणारे वाटतील; पण जुळवून घेतल्यास सगळे काही हळूहळू सुरळीत होईल.
मिथुन- व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा येईल. मोठ्या सौयात फायदा होईल. भावंडाशी मधुर संबंध राहतील. त्यांच्यासमवेत मौजमजा कराल. जवळच्या सहलीला जाण्याचे योग येतील. किरकोळ स्वरूपाच्या अडचणी दूर होतील.
कर्क- फार दगदग होईल, अशी कामे करू नका. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. प्रवास शक्यतो टाळा. वाहने जपून चालवा. एखाद्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. मनासारखे मिष्टान्न भोजन मिळेल.
सिंह-व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. नवनवीन कामे मिळतील. तुमचे महत्त्व वाढेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू प्राप्त होतील. जीवनसाथीची खंबीर साथ राहील. जनसंपर्कातून फायदे होतील.
कन्या- संयमाने वागण्याची गरज आहे. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. मनात काळजीचे विचार राहतील. आरोग्याची काळजी घ्या. एखादी महत्त्वाची व्यक्ती तुम्हाला चांगली मदत करेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
तूळ - नशिबाचा काल तुमच्या बाजूने राहील. किरकोळ स्वरुपाच्या अडचणी येतील मात्र, त्यातून आपण मार्ग काढाल. हाती घेतलेल्या महत्वाच्या योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे कराल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील.
वश्चिक-घरी पाहुणे मंडळी येतील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. काही कारणाने कुरबुरी होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. सुख-सोयी वाढवून मिळतील.
धनू-व्यवसाय सतत व्यस्त राहाल. कामाचा ताण राहील. मात्र, त्यातून तुमचा फायदा होईल. त्यामुळे काम करावे लागले तरी काही वाटणार नाही. जवळच्या प्रवासाचे योग येतील. प्रवासाचे नीट नियोजन करा. कलाकार मंडळींना चांगला काळ आहे.
मकर- अचानक धनलाभ होऊ शकतो. मालमत्तेच्या कामात व्यस्त राहाल. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मात्र, त्यासाठी तुम्हाला बरेच प्रयत्न करावे लागतील.
कुंभ- विविध प्रकारचे लाभ होतील. जनसंपर्क चांगला राहील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. मुलांची प्रगती होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. भेटवस्तू मिळतील.
मीन- आपण हाती घेतलेल्या कामात विलंब होईल. विविध प्रकारच्या पूर्तता करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. अनावश्यक खर्च होईल. काहींना प्रवास घडून येतील. प्रवासात दगदग होईल. मुलांची काळजी वाटेल.