आजचे राशीभविष्य, ३ जुलै २०२२: सिंहने महत्वाचे निर्णय टाळावे, वृषभसाठी यशाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 07:21 IST2022-07-03T07:21:14+5:302022-07-03T07:21:39+5:30

Today's horoscope, July 3, 2022: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या...

Todays horoscope July 3 2022 Leo should avoid important decisions a day of success for Taurus | आजचे राशीभविष्य, ३ जुलै २०२२: सिंहने महत्वाचे निर्णय टाळावे, वृषभसाठी यशाचा दिवस

आजचे राशीभविष्य, ३ जुलै २०२२: सिंहने महत्वाचे निर्णय टाळावे, वृषभसाठी यशाचा दिवस

मेष:  आज कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उद्विग्न होईल. छातीतील दुखणे किंवा इतर आजारामुळे चिंतातुर व्हाल. आर्थिक खर्चात वाढ होईल. आणखी वाचा...

वृषभ: आज आपण जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. विरोधकांवर मात करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान संभवतात. आणखी वाचा...

मिथुन: सकाळी आपले मन अशांत राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य समाधानकारक नसल्याने आपली चिडचिड होईल. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकणार नाही. दुपार नंतर मात्र मित्र व स्नेहीजनांच्या सहवासामुळे मनास प्रसन्नता लाभेल. आणखी वाचा...

कर्क: आज आपण भावनेच्या भरात वाहून जाल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. आणखी वाचा...

सिंह: आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल. तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. गैरसमज व मतभेद होण्याची शक्यता असल्याने वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा...

कन्या: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. दुपार नंतर मनःस्थिती द्विधा होईल. त्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात व्यत्यय येईल. आणखी वाचा...

तूळ: आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य वाढेल. उच्च अधिकार्यांमुळे व्यवसायात आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा...

वृश्चिक: आज नशिबाची साथ लाभेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या बातम्या येतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ सुद्धा संभवतो. नोकरीत पदोन्नती संभवते. आणखी वाचा...

धनु: आज सकाळी आपणास प्रकृतीचा त्रास जाणवेल. नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम मनःस्वास्थ्यावर होईल. सबब वैचारिक स्तरावर संयम बाळगावा लागेल. आर्थिक चणचण भासेल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होईल. आणखी वाचा...

मकर:  आज कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद लुटाल. दुपार नंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. आणखी वाचा...

कुंभ: आजचा आपला दिवस सुखाचा व शांततेचा आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा...

मीन: आज आपल्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल, मात्र शक्यतो भिन्नलिंगी व्यक्तींपासून दूर राहणे हितावह होईल. आज वाद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो बौद्धिक चर्चा टाळा. नवीन कार्यात अडचणी येतील. आणखी वाचा...

Open in app

Web Title: Todays horoscope July 3 2022 Leo should avoid important decisions a day of success for Taurus