आजचे राशीभविष्य २१ डिसेंबर २०२४ : या राशीला धनलाभ होईल; नोकरीत सहकारी व हाताखालचे लोक ह्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 07:14 IST2024-12-21T07:09:38+5:302024-12-21T07:14:11+5:30

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope December 21, 2024: This zodiac sign will benefit financially; You will get the expected cooperation from colleagues and subordinates at work. | आजचे राशीभविष्य २१ डिसेंबर २०२४ : या राशीला धनलाभ होईल; नोकरीत सहकारी व हाताखालचे लोक ह्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल

आजचे राशीभविष्य २१ डिसेंबर २०२४ : या राशीला धनलाभ होईल; नोकरीत सहकारी व हाताखालचे लोक ह्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल

मेष

आज आपणास शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्याने हताश होण्याची वेळ येईल. सट्ट्या संबंधी थोडे चिंतित राहाल. आणखी वाचा

वृषभ

आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास व दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलां कडून आपणास काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम यश मिळवतील. आणखी वाचा

मिथुन

आजचा दिवस नवीन योजना सुरु करण्यास उत्तम आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल.आणखी वाचा

कर्क

आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. परिणामतः मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. गैरसमजातून काही मतभेद होतील. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल.आणखी वाचा

सिंह

आज भरपूर आत्मविश्वास व दृढ निर्णयशक्ती ह्यांच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावना प्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल. आणखी वाचा

कन्या

आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कठोर बोलणे व गर्व ह्यामुळे कोणाशी भांडण होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल.आणखी वाचा

तूळ

आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्टया आपण आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल.आणखी वाचा

वृश्चिक

आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान - सन्मान उचांवेल. नोकरी - व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठ व वडिलधार्‍यांकडून फायदा होईल.आणखी वाचा

धनु

शरीरात थकवा, उबग व बेचैनी राहील. प्रकृती साधारण राहील. मन चिंतित असेल. आज शक्यतो प्रवास टाळावेत. संतती विषयी चिंता निर्माण होईल. नशिबाची साथ मिळणार नाही.आणखी वाचा

मकर

आज आहाराकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा प्रकृतीत बिघाड होऊ शकेल. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल.आणखी वाचा

कुंभ

आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल ह्यामुळे प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल. आणखी वाचा

मीन

आज घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे आपण आत्मविश्वास पूर्वक उत्तम प्रकारे करू शकाल. आज आपणास संताप व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल.आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope December 21, 2024: This zodiac sign will benefit financially; You will get the expected cooperation from colleagues and subordinates at work.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app