आजचे राशीभविष्य, ७ एप्रिल २०२४ : मीनसाठी काळजीचा तर धनुसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 07:14 IST2024-04-07T07:10:36+5:302024-04-07T07:14:53+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope, 7 April 2024 : A day of worry for Pisces and joy for Sagittarius | आजचे राशीभविष्य, ७ एप्रिल २०२४ : मीनसाठी काळजीचा तर धनुसाठी आनंदाचा दिवस

आजचे राशीभविष्य, ७ एप्रिल २०२४ : मीनसाठी काळजीचा तर धनुसाठी आनंदाचा दिवस

मेष - आज आपणास मोठा आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होईल. एखाद्या सहलीचे यशस्वी नियोजन करू शकाल. आणखी वाचा

वृषभ -  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडेल.  आणखी वाचा

मिथुन- आज प्रतिस्पर्धी व वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगले असेल.  आणखी वाचा

कर्क- आज अवैध व निषेधार्ह विचारां पासून दूर राहणे हितावह होईल. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर परदेशातून एखादी चांगली बातमी येईल. आणखी वाचा

सिंह- आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र व संबंधितांसह हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी सहल सुद्धा करू शकाल. सामाजिक सन्मान होतील. आणखी वाचा

कन्या - आज स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश व कीर्ती वाढेल. स्त्रियांना माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्नता जाणवेल.  आणखी वाचा

तूळ- आज आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे लेखन किंवा अन्य विधायक कार्य करण्यात आपण आघाडीवर असाल. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. आज शक्यतो प्रवास टाळावा.  आणखी वाचा

वृश्चिक-  आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. स्वभावातील हट्टीपणा सोडल्यास अनेक समस्या सुटतील. आज नवीन वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधने ह्यावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

धनु- आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. मित्र व स्वकीयांसह वेळेचा सदुपयोग आनंददायी वातावरणात करू शकाल. दुपार नंतर शारीरिक व मानसिक दृष्टया आपण बेचैन राहाल.  आणखी वाचा

मकर- आज वाद होण्याची शक्यता आहे. आज एखाद्या धार्मिक किंवा परोपकारी कार्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपार नंतर मन प्रफुल्लित राहील. आणखी वाचा

कुंभ- आज आपले मन आनंदी राहील. मनात नकारात्मक विचार येतील. आपल्या कृती संयमित ठेवाव्या लागतील. अचानकपणे खर्च उदभवतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल.  आणखी वाचा

मीन- आजचा दिवस कोणाशी आर्थिक व्यवहार करण्यास अनुकूल नाही. आज वाद संभवतात. मन एकाग्र होण्यात अडचणी येतील. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुता निर्माण होईल. आणखी वाचा

Open in app

Web Title: Today's Horoscope, 7 April 2024 : A day of worry for Pisces and joy for Sagittarius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.