आजचे राशीभविष्य, २७ जानेवारी २०२५ : मिथुनसाठी आनंदाचा आणि कन्येसाठी चिंतेचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 07:17 IST2025-01-27T07:16:41+5:302025-01-27T07:17:08+5:30

Today's Horoscope : वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope, 27 January 2025: A day of joy for Gemini and worry for Virgo | आजचे राशीभविष्य, २७ जानेवारी २०२५ : मिथुनसाठी आनंदाचा आणि कन्येसाठी चिंतेचा दिवस

आजचे राशीभविष्य, २७ जानेवारी २०२५ : मिथुनसाठी आनंदाचा आणि कन्येसाठी चिंतेचा दिवस

मेष - आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील. एखाद्या मंगल कार्याला उपस्थिती लावाल. प्रवास संभवतो. आणखी वाचा

वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने आपण निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. खाण्या - पिण्यामुळे प्रकृती बिघडेल. आणखी वाचा

मिथुन- आजच्या दिवसाचा प्रारंभ आरामदायी व प्रसन्न वातावरणात होईल. पाहुणे व मित्रांच्या सहवासात मेजवानी, सहल, किंवा मनोरंजनाचा बेत ठरवाल. नवे कपडे, दागीने व वाहन खरेदी करू शकाल. मन आनंदाने भरून जाईल.  आणखी वाचा

कर्क-  आजचा दिवस खुशीचा व यशाचा आहे. कुटुंबात सुख - शांती व समाधान राहील. नोकरदारांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. नोकर वर्गाकडून व मातुल घराण्याकडून लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील.  आणखी वाचा

सिंह - आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूपात व्यक्त होईल. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. प्रिय व्यक्तीचा सुखद सहवास लाभेल.  आणखी वाचा

कन्या - आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. आरोग्य बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी पटणार नाही व त्यामुळे घरात शांतता नांदणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

तूळ-  नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक किंवा व्यावहारिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल.  आणखी वाचा

वृश्चिक - आज कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी गैरसमज होणाची शक्यता आहे. मनात येणारे नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील.  आणखी वाचा

धनु- आज संततीचे सुख व स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास आजचा दिवस उत्तम आहे. विदेश व्यापारात लाभ होईल. आपल्या हातून एखादे मंगल कार्य संपन्न होईल.  आणखी वाचा

मकर- आज सावध राहावे लागेल. कठोर परिश्रमा नंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. आरोग्याची तक्रार राहील. एखादी दुर्घटना संभवते. आणखी वाचा

कुंभ- आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवात करू शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती होईल. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे. आणखी वाचा

मीन - आज नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठां कडून प्रोत्साहन मिळाल्याने आपणास अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार वृद्धी होईल. वसुलीची रक्कम प्राप्त होईल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, 27 January 2025: A day of joy for Gemini and worry for Virgo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app