आजचे राशीभविष्य, २६ जानेवारी २०२५ : आजचा दिवस लाभदायी, व्यवसायात प्राप्तीत वाढ होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 07:24 IST2025-01-26T07:23:52+5:302025-01-26T07:24:10+5:30

Today's Horoscope : वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope, 26 January, 2025: Today is a beneficial day, there will be an increase in income in business. | आजचे राशीभविष्य, २६ जानेवारी २०२५ : आजचा दिवस लाभदायी, व्यवसायात प्राप्तीत वाढ होईल

आजचे राशीभविष्य, २६ जानेवारी २०२५ : आजचा दिवस लाभदायी, व्यवसायात प्राप्तीत वाढ होईल

मेष - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. सरकार विरोधी कृत्यां पासून शक्यतो दूर राहा. एखादा अपघात संभवतो. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे स्वास्थ्य बिघडेल. कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत.  आणखी वाचा

वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. मित्र व स्वकीयांसह हिंडण्या - फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे व स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. आणखी वाचा

मिथुन-  आजचा दिवस भरपूर मनोरंजन करून आनंदात घालविण्याचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कार्यालयीन वातावरण आपणास अनुकूल असेल. मित्रांसह सहलीला जाऊ शकाल. आणखी वाचा

कर्क-  आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. परंतु दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. प्रकृती सुधारेल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता असल्यामुळे आपणास संयमित राहावे लागेल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. परंतु दुपार नंतर काही ना काही कारणाने आपण चिंतीत व्हाल व त्याचा प्रतिकूल परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होईल. आणखी वाचा

तूळ-  कौटुंबिक वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. मनात नकारात्मक विचार येतील. कुटुंबियांना आपल्यामुळे काही त्रास होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी सौख्य व समाधान लाभेल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. एखादी चांगली बातमी ऐकीवात येईल. दुपार नंतर मात्र कुटुंबात एखादा गैरसमज पसरून वाद होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

धनु- आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आनंद व सौख्यलाभ ह्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. स्वभावातील तापटपणा वाढेल. आणखी वाचा

मकर- आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. पत्नी व संतती ह्यांच्याकडून काही फायदा संभवतो. कौटुंबिक जीवनात घडणाऱ्या काही सुखद प्रसंगामुळे आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल.  आणखी वाचा

कुंभ- आजचा दिवस लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल. सामाजिक मान - सन्मान होतील. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. स्वास्थ्य ठीक राहील. व्यापारातील येणे वसूल होईल. आणखी वाचा

मीन- बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास संभवतात. परदेशातील मित्र किंवा स्वकियांशी संपर्क साधू शकाल. आज आपणास उत्साह व थकवा दोन्हीही जाणवतील. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, 26 January, 2025: Today is a beneficial day, there will be an increase in income in business.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app