आजचे राशीभविष्य, २३ जानेवारी २०२३: कोणत्याही कामात आज यश मिळेल; पूर्ण दिवस आनंदात जाईल, पाण्यापासून दूर राहणे हितावह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 07:33 IST2023-01-23T07:21:49+5:302023-01-23T07:33:31+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, २३ जानेवारी २०२३: कोणत्याही कामात आज यश मिळेल; पूर्ण दिवस आनंदात जाईल, पाण्यापासून दूर राहणे हितावह
मेष- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी - सजावट ह्याचा सुद्धा विचार कराल. आणखी वाचा
वृषभ- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखादया रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास संभवतात. आणखी वाचा
मिथुन- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. आज नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा
कर्क- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. प्रणयक्रिडेत यशस्वी व्हाल. आणखी वाचा
सिंह- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. आणखी वाचा
कन्या- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उदभवतील. आणखी वाचा
तूळ- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्या विचार तरंगांमुळे त्रास होईल. आई व स्त्री विषयक चिंता सतावेल. आजचा दिवस प्रवासासाठी प्रतिकूल आहे. पाण्यापासून दूर राहणे हितावह राहील. आणखी वाचा
वृश्चिक- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकार्यांकडून सौख्य व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आणखी वाचा
धनु- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड होईल. मन दुःखी राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. कामात अपेक्षित यश न मिळाल्याने मन निराश होईल. आणखी वाचा
मकर- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीची शक्यता असल्याने सांभाळून राहा. आणखी वाचा
कुंभ- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आर्थिक व्यवहार तसेच जमीन - जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
मीन- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज मित्रां कडून आपणाला लाभ होईल व त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र व वडीलधार्यांशी संपर्क साधू शकाल. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. आणखी वाचा