आजचे राशीभविष्य, २ एप्रिल २०२४ : आजचा दिवस चिंतामुक्त, नोकरीत लाभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 07:12 AM2024-04-02T07:12:54+5:302024-04-02T07:13:35+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope, 2 April 2024 : Today will be worry-free, gain in employment | आजचे राशीभविष्य, २ एप्रिल २०२४ : आजचा दिवस चिंतामुक्त, नोकरीत लाभ होईल

आजचे राशीभविष्य, २ एप्रिल २०२४ : आजचा दिवस चिंतामुक्त, नोकरीत लाभ होईल

मेष- आज आपल्यात तरतरीतपणा व उत्साह यांचा अभाव राहील. तसेच रागाचे प्रमाण वाढल्याने काम बिघडण्याची शक्यता आहे. कार्यालयात अधिकारी, विरोधक व घरात कुटुंबीय यांच्याशी वादात न पडता शांत राहून दिवस घालवणे अधिक चांगले. आणखी वाचा

वृषभ - आज हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने आपण निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. खाण्या - पिण्यामुळे प्रकृती बिघडेल. नवीन काम सुरू करायला आजचा दिवस अनुकूल नाही. आणखी वाचा

मिथुन- आजच्या दिवसाचा प्रारंभ आरामदायी व प्रसन्न वातावरणात होईल. पाहुणे व मित्रांच्या सहवासात मेजवानी, सहल, किंवा मनोरंजनाचा बेत ठरवाल. नवे कपडे, दागीने व वाहन खरेदी करू शकाल. मन आनंदाने भरून जाईल.  आणखी वाचा

कर्क- आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. त्यांच्या सहवासात घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता मिळेल. नोकरदारांना नोकरीत लाभ होईल. सहकारी सहकार्य करतील. आणखी वाचा

सिंह-  आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूपात व्यक्त होईल. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. प्रिय व्यक्तीचा सुखद सहवास लाभेल. संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील.  आणखी वाचा

कन्या - आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. आरोग्य बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी पटणार नाही व त्यामुळे घरात शांतता नांदणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

तूळ- आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. सांप्रतकाळी धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस अनुकूल आहे. योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आपणास लाभदायक ठरेल.  आणखी वाचा

वृश्चिक-  आज कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी गैरसमज होणाची शक्यता आहे. मनात येणारे नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील.  आणखी वाचा

धनु- आज आपल्या कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल. प्रवासाची शक्यता आहे. स्वकीयांची भेट आपणाला आनंदित करील. आणखी वाचा

मकर- आज आपण एखाद्या मंगल कार्यांत मग्न राहाल. परोपकारी कार्यांवर पैसा खर्च होईल. नातलग, संबंधित व कुटुंबीय यांच्याशी जपून बोला कारण आपले बोलणे कोणाचे मन दुखावण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

कुंभ- आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवात करू शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती होईल. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे.  आणखी वाचा

मीन- आज नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठां कडून प्रोत्साहन मिळाल्याने आपणास अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार वृद्धी होईल. वसुलीची रक्कम प्राप्त होईल.  आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, 2 April 2024 : Today will be worry-free, gain in employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app