आजचे राशीभविष्य, १ एप्रिल २०२४ : मेषसाठी काळजीचा तर कर्कसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 07:37 AM2024-04-01T07:37:40+5:302024-04-01T07:38:07+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope, 1 April 2024 : A day of worry for Aries and joy for Cancer | आजचे राशीभविष्य, १ एप्रिल २०२४ : मेषसाठी काळजीचा तर कर्कसाठी आनंदाचा दिवस

आजचे राशीभविष्य, १ एप्रिल २०२४ : मेषसाठी काळजीचा तर कर्कसाठी आनंदाचा दिवस

मेष- आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड व संबंधात कटुता निर्माण होईल. मानसिक व्यग्रता व मनाची बेचैनी ह्यामुळे आपले कामात लक्ष लागणार नाही. आणखी वाचा

वृषभ - शारीरिक दृष्टया अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळण्यास उशीर होईल व त्यामुळे निराश व्हाल. आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका. योग्य आहार घ्या. आज कामाचा व्याप वाढेल. शिथिलता राहील. आणखी वाचा

मिथुन-  आजचा दिवस आनंददायी आहे. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्यासह एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्वादिष्ट भोजन मिळेल. नव्या कपड्यांची खरेदी होईल.  आणखी वाचा

कर्क- आजचा दिवस व्यापार - व्यवसायात फायदा मिळवून देणारा आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आज आपल्या सहवासात कुटुंबियांचा वेळ खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.  आणखी वाचा

सिंह-  आजचा दिवस नवनिर्माण व कला ह्या साठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासात प्रअनुकूलता लाभेल. स्नेही व मित्र यांच्या गाठीभेटी होतील. प्रकृती उत्तम राहिली तरी सुद्धा रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नी बरोबर वाद किंवा मतभेद होतील. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. आणखी वाचा

तूळ- आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी राहील. एखाद्या प्रवासाने मनाला आनंद मिळेल. आणखी वाचा

वृश्चिक-  आज आपणास जर कौटुंबिक वातावरणात शांतता हवी असेल तर वाणीवर संयम ठेवावा लागेल. आपल्या बोलण्याने एखाद्याचे मन दुखावले जाईल. आपल्या वागणुकीचा कोणास त्रास होऊ नये म्हणून म्हणून वर्तन सुद्धा संयमित ठेवा.  आणखी वाचा

धनु- आज निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आपणाला आनंदी ठेवेल. एखादा प्रवास संभवतो. आपली माणसे भेटल्याचा आनंद होईल. आणखी वाचा

मकर- आज मन अस्वस्थ राहील. एखाद्या मांगलिक किंवा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. स्वकीय व मित्रांशी मतभेद होतील. धनहानी व मानहानीची शक्यता आहे. आज एखाद्या गूढ विद्येकडे आपला कल होईल आणखी वाचा

कुंभ- आज आपणांस मिळणाऱ्या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे. व्यापारी वर्गाला व्यापारात फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल.  आणखी वाचा

मीन- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्यामुळे आपल्या मनाची प्रसन्नता वाढेल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, 1 April 2024 : A day of worry for Aries and joy for Cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app