Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०८ नोव्हेंबर २०२२: आज मिथुन राशीतील व्यक्तींना होणार आर्थिक लाभ; समाजात मान अन् प्रतिष्ठाही वाढेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 07:29 IST2022-11-08T07:25:28+5:302022-11-08T07:29:07+5:30
Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०८ नोव्हेंबर २०२२: आज मिथुन राशीतील व्यक्तींना होणार आर्थिक लाभ; समाजात मान अन् प्रतिष्ठाही वाढेल!
मेष- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरवात आपण स्फूर्तीने व उत्साहाने कराल. मित्र व सगे सोयरे यांच्या येण्या जाण्याने घरातील वातावरण आनंदाचे राहील. आणखी वाचा
वृषभ- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका. आज गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रकृती खराब असल्यामुळे मन उदास बनेल. आणखी वाचा
मिथुन- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. मित्रांकडून फायदाही होईल व त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील. आणखी वाचा
कर्क- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापारी वर्गास लाभ होईल. नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील. आणखी वाचा
सिंह- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस आळस व थकवा ह्यात जाईल. आपल्या तापट स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल. आणखी वाचा
कन्या-आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. अती उत्साह व क्रोधाचे प्रमाण वाढल्याने आरोग्यावर ताण येण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा
तूळ- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसह बाहेर जावे लागेल. आणखी वाचा
वृश्चिक- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपण निश्चिंतपणा व सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. आणखी वाचा
धनु- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून, प्रवासात त्रास संभवतो. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्यांची काळजी राहील. कामे अपूर्ण राहिल्याने नैराश्य येईल. आणखी वाचा
मकर- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपली मनःस्थिती व आरोग्य चांगले राहणार नाही. कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. आणखी वाचा
कुंभ- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. चिंता दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात उत्साह संचारल्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा
मीन- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. वाद व संघर्ष टाळण्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहावे लागेल. आणखी वाचा