Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- १७ नोव्हेंबर २०२२: आईच्या आरोग्याची काळजी राहील, तर वृषभ राशीला चिंतेतून मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 07:51 IST2022-11-17T07:50:25+5:302022-11-17T07:51:05+5:30

Today's Horoscope- November 17, 2022: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी वाचा तुमचं आजचं राशीभविष्य...

Todays Daily Horoscope November 17 2022 Mothers health will be worried while Taurus will be free from worry | Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- १७ नोव्हेंबर २०२२: आईच्या आरोग्याची काळजी राहील, तर वृषभ राशीला चिंतेतून मुक्तता

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- १७ नोव्हेंबर २०२२: आईच्या आरोग्याची काळजी राहील, तर वृषभ राशीला चिंतेतून मुक्तता

मेष: आईच्या आरोग्याची काळजी राहील. स्थावर संपत्ती संबंधी कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. मानसिक तळमळ व शारीरिक अस्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्वाभिमान दुखावला जाईल. आणखी वाचा...

वृषभ: आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने आपण स्फूर्ती व उत्साह अनुभवाल. हळवेपणा व काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आपल्या अंतर्गत कला व साहित्य बाहेर येण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांकडे चांगले लक्ष राहील. आणखी वाचा...

मिथुन: आज थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन यशस्वी कराल. मिष्टान्नाची प्राप्ती होईल. विद्यार्जनाच्या दृष्टीने विद्यार्थांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आणखी वाचा...

कर्क: आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज भावनांच्या प्रवाहात आपण मश्गुल व्हाल ज्यात कुटुंबीय व स्नेही, नातलग सहभागी होतील. भेट वस्तू मिळतील. स्वादिष्ट भोजन व बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल. आणखी वाचा...

सिंह: आज जास्त चिंतातुर व भावनाशील राहिल्याने आपणास शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. चुकीच्या वाद - विवादामुळे भांडण निर्माण होईल. कोर्ट - कचेरी प्रकरणात सावध राहावे. उक्ती व कृती यात संयम राखणे आवश्यक आहे. आणखी वाचा...

कन्या: आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे. व्यापार - व्यवसायाच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल. नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात सुख - शांती लाभेल. आणखी वाचा...

तूळ: आज घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आईकडून लाभ होईल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कामाची स्तुती होऊन प्रेरणा सुद्धा मिळेल. आणखी वाचा...

वृश्चिक: आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा व आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. मनात गाढ चिंता सतत येत राहतील. नोकरी - व्यवसायात अडचणी येतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी वादविवाद टाळा. आणखी वाचा...

धनु: आज आपण वाणी व संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे प्रकृती खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. आणखी वाचा...

मकर: विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. धन लाभ संभवतो. संततीच्या अभ्यासा विषयी चिंता निर्माण होईल. कामात यश मिळेल. विचार अस्थिर व द्विधा मनःस्थिती होईल. आणखी वाचा...

कुंभ: आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती व सफलता मिळेल. कुटुंबात एकोपा राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.आपले विचार व व्यवहार यांत हळवेपणा राहील. नोकरीत सहकारी सहकार्य करतील. आणखी वाचा...

मीन: आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रेमालाप होईल. आणखी वाचा...

Web Title: Todays Daily Horoscope November 17 2022 Mothers health will be worried while Taurus will be free from worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app