Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- १६ नोव्हेंबर २०२२: कर्कचे मन संयमी राहील, तर सिंह राशीसाठी वादाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 07:28 IST2022-11-16T07:27:24+5:302022-11-16T07:28:05+5:30
Today's Horoscope- November 16, 2022: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी वाचा तुमचं आजचं राशीभविष्य...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- १६ नोव्हेंबर २०२२: कर्कचे मन संयमी राहील, तर सिंह राशीसाठी वादाचा दिवस
मेष: मानसिक भीती बरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे आपण बेचैन व्हाल. आईचे स्वास्थ्य खराब असेल. वाहन चालविताना सावधानी बाळगा. आज महत्वाचा व्यवहार करू नका. कार्यालय किंवा अन्य ठिकाणी स्त्री वर्गाकडून नुकसान होऊ शकते. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. आता सूर्य तूळेतून वृश्चिकेत प्रवेश करेल. आणखी वाचा...
वृषभ: आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रियजनांचा सहवास व सार्वजनिक सन्मान मिळेल. व्यापारात वाढ होईल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. सूर्य वृश्चिकेत आल्याने आपल्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. आणखी वाचा...
मिथुन: आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून ती पूर्ण करू शकाल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. नोकरी - व्यवसायात बरोबरचे कार्यकर्ते किंवा सहकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आणखी वाचा...
कर्क: आपले मन अगदी संयमी राहील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. प्रवासाची व आर्थिक लाभाची शक्यता आहे. सूर्याचे वृश्चिकेतील भ्रमण आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या दरम्यान आपण वाणी संयमित ठेवावी. आणखी वाचा...
सिंह: आज मनास चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वाद - विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट - कचेरीच्या कामात सावधपणे पाऊले टाका. भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन काही अविचारी काम हातून घडणार नाही याकडे लक्ष द्या. वाणी व व्यवहार ह्यात संयम व विवेक राखावा. आणखी वाचा...
कन्या: वरिष्ठ आपल्यावर खूष झाल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. विवाहोत्सुकासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. स्त्री मित्र लाभदायक होतील. निसर्ग सौंदर्य स्थळी पर्यटन होईल. वैवाहिक सुखाचा मनसोक्त आनंद मिळवाल. सूर्य आपल्या तृतीय स्थानी आला आहे. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. आणखी वाचा...
तूळ: मान - सन्मानात वाढ होईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. व्यापार्यांच्या व्यापारात तसेच मिळकतीत वाढ होईल. कौटुंबीक जीवन आनंदपूर्ण राहील. स्वास्थ्य चांगले राहील. उत्तम सांसारिक सुख प्राप्त होईल. वृश्चिकेतील सूर्याचे भ्रमण आपल्यासाठी सामान्यच राहील. आणखी वाचा...
वृश्चिक: कार्यक्षेत्रात सुद्धा अधिकारी वर्गाचे नकारात्मक वागणे आपणास हताश बनवेल. प्रतिस्पर्धी व विरोधक यांची ताकद वाढेल. व्यवसायात संकटे येतील. आज महत्वाचे निर्णय घेऊ नका. आता एक महिनाभर सूर्य आपल्या राशीत राहणार आहे. आपला आत्मविश्वास वाढेल. शासकीय कार्यात आपणास यश प्राप्त होईल. आणखी वाचा...
धनु: अनपेक्षित घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवावे. सरकार विरोधी प्रवृत्ती घातक ठरेल. काही कारणाने वेळेवर भोजन मिळणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवा. भांडण - तंट्या पासून दूर राहा. सूर्य वृश्चिकेत आल्याने शत्रू पक्ष कमकुवत होईल. आणखी वाचा...
मकर: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल. त्यामुळे आर्थिक स्तर मजबूत होईल. मान, प्रतिष्ठा वाढेल. एखादा प्रवास संभवतो. वृश्चिक संक्रांति पासूनचा एक महिना आपल्यासाठी विशेष ठरू शकतो. आणखी वाचा...
कुंभ: कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल. नोकरी - व्यवसायात सहकारी सहकार्य करतील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. सूर्याचे वृश्चिकेतील भ्रमण आपणास अनुकूल असेल. आपण केलेल्या कष्टांमुळे आपल्या कार्यक्षेत्रातील कामे पूर्ण होतील. आणखी वाचा...
मीन: हृदयाची कोमलता प्रियजनांस जवळ आणेल. स्वभावात हळवेपणा व रसिकता राहील. स्वास्थ्याच्या दृष्टीने दिवस मध्यम आहे. विद्यार्थी अभ्यासात कौशल्य दाखवतील. मानसिक संतुलन व बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. सूर्य वृश्चिकेत आल्याने आपणास नशिबाची साथ मिळेल. आणखी वाचा...