आजचे राशीभविष्य, २६ मार्च: प्रिय व्यक्तीचा सहवास, भेटवस्तू मिळतील, दिवस आनंदात जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 07:32 AM2024-03-26T07:32:42+5:302024-03-26T07:33:24+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Today Horoscope 26 March 2024 Tarot card reading Astrology career love life predictions | आजचे राशीभविष्य, २६ मार्च: प्रिय व्यक्तीचा सहवास, भेटवस्तू मिळतील, दिवस आनंदात जाईल!

आजचे राशीभविष्य, २६ मार्च: प्रिय व्यक्तीचा सहवास, भेटवस्तू मिळतील, दिवस आनंदात जाईल!

मेष: आज शारीरिक व मानसिक उत्साह अनुभवाल. मित्र व स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. तसेच त्यांच्यासह एखाद्या समारंभास किंवा सहलीस जाऊ शकाल. आणखी वाचा 

वृषभ: कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असले तरीही आपली कामातील तत्परता व कुशलता प्रगतीस सहाय्यक होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करू शकतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभू शकेल. पोटाच्या तक्रारीने त्रस्त व्हाल. आणखी वाचा 

मिथुन: पाणी तसेच इतर प्रवाही पदार्थां पासून सावध राहा. कुटुंब किंवा जमीन ह्या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळा. शारीरिक व मानसिक स्वस्थतेचा अभाव राहील. आणखी वाचा 

कर्क: कामातील यश व प्रियव्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदीत राहाल. आर्थिक लाभ होऊ शकेल. लहान सहलीस जाऊ शकाल. मान - सन्मान वाढेल. आणखी वाचा 

सिंह: आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश जरा कमीच मिळेल. आणखी वाचा 

कन्या: उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, जोडीदाराचा सहवास व प्रवास ह्यात आपला दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा 

तूळ: सगे सोयरे ह्यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. शारीरिक व मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा 

वृश्चिक: वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. स्नेही मित्र यांच्या कडून भेटवस्तू मिळतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. . वैवाहिक जीवनात मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा 

धनु: गृहजीवनात आनंद व समाधान मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान वाढेल. आणखी वाचा 

मकर: व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. शारीरिक थकवा जाणवेल. संततीच्या समस्या आपणास त्रस्त करतील. व्यर्थ खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. आणखी वाचा 

कुंभ: कौटुंबिक वातावरण कलुशित होईल. आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्याने मानसिक थकवा जाणवेल. आपल्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस व्यवसायात भागीदारीसाठी अनुकूल आहे. दांपत्य जीवनात अधिक जवळीक निर्माण करता येऊ शकेल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होतील. आणखी वाचा 

Web Title: Today Horoscope 26 March 2024 Tarot card reading Astrology career love life predictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app