आजचे राशीभविष्य - 27 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना नोकरीत अनुकूल घटना घडतील, तर यांना आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 07:24 IST2023-05-27T07:21:31+5:302023-05-27T07:24:05+5:30
Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - 27 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना नोकरीत अनुकूल घटना घडतील, तर यांना आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले
मेष- विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. परीक्षांचे निकाल मनासारखे लागतील. त्यामुळे कौतूक होईल. नवीन संधी मिळतील. काहींना जवळच्या प्रवासाचा योग येईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. मनात आनंदी विचार राहतील.
वृषभ- नोकरीत अनुकूल घटना घडतील. नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. ज्यांना नोकरी हवी असेल त्यांना चांगली संधी मिळेल. घरी पाहुणे मंडळी येतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. खाण्या पिण्याची चंगळ राहील.
मिथुन- जवळच्या सहलीला जाऊन याल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात भरभराट होईल. मात्र, बाजारपेठेचा अंदाज घेऊनच गुंतवणूक केली पाहिजे. चमचमीत पदार्थ खाण्यास मिळतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. एखादी भेटवस्तू देण्यास हरकत नाही.
कर्क- मनात आनंदी विचार राहतील. विविध प्रकारच्या कामांना गती मिळेल. सोप्या रीतीने कामे पूर्ण होतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मुलाचे कौतुक होईल. त्याच्याशी संवाद साधा, सरकारी कामे मार्गी लागतील, चैन, हौसमौज यावर खर्च कराल.
सिंह- आपल्या अनेक अडचणी दूर होतील. मनात प्रसन्न विचार राहतील. जीवनसाथीची चांगली साथ राहील. मुलांची प्रगती होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतील. नोकरीत अनुकूल वातावरण राहील.
कन्या- महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. प्रवासात सतर्क राहा. आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. घराच्या सजावटीसाठी पैसे खर्च केले जातील. मनात काळजीचे विचार राहतील.
तूळ - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता मिळेल. योग्य संधी मिळेल. चांगल्या लोकांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मौजमजा करण्याच्या निमित्ताने प्रवास घडून येईल.
वृश्चिक- नोकरी नवीन संधी मिळेल. मात्र. कामाचा ताण वाढेल. घरी पाहुणे मंडळी येतील. आत्मविश्वासाने वाटचाल सुरू राहील. जीवनसाथीची काळजी घ्या. मुलाची प्रगती होईल. मात्र त्यांच्याशी संवाद ठेवा. त्यांना काय हवे नको ते विचारा. आर्थिक आवक सामान्य राहील.
धनू- भाग्याची चांगली साथ तुम्हाला राहील. मनात आनंदी विचार राहतील. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. अडचणी दूर होतील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रयास घडून येईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल.
मकर- महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवास शक्यतो टाळा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. गोड बोलून अडचणीत आणणाऱ्या लोकांपासून सावध राहा. मुलांची काळजी घ्या.
कुंभ- आपल्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात भरभराट होईल. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. नोकरीत कामाचा ताण राहील. मात्र आपले महत्त्व सगळ्यांच्या लक्षात येईल.
मीन- महत्त्वाच्या कामात विलंब होईल. त्यामुळे उत्साह थोडा कमी होईल. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. विरोधर्काच्या कारवाया सुरू राहतील. आर्थिक आचक राहील. भावंडांना मदत कराल. मुलांना योग्य संधी मिळतील.
- विजय देशपांडे (ज्योतिषविशारद )