मेष: आजचा दिवस आनंदोस्तव साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदाचे असेल. स्त्रीयांना माहेरहून काही लाभ होऊन एखादी चांगली बातमी मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मित्र व स्नेह्यांसह आनंददायी प्रवास कराल. त्यांच्याकडून भेटवस्तू प्राप्त झाल्याने आपणास आनंद होईल. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपणास विविध चिंता सतावतील. प्रकृतीची साथ मिळणार नाही. स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्याने घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील. काही कारणास्तव खर्च वाढेल. केलेल्या कष्टाचे फळ असमाधानकारक असेल. त्यामुळे नैराश्य येईल. घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. पत्नी व संतती कडून एखादी चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा
कर्क: आज गृह सजावटीवर आपण विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी व नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात. कुटुंबात सुख - शांती नांदेल. सरकारी लाभ मिळतील. आपली प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल. आज सर्व कामे शांतपणे व व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आणखी वाचा
सिंह: आज स्वभावात उग्रता व संताप असल्यामुळे काम करण्यात आपले मन लागणार नाही. वादविवादात आपल्या अहंकारामुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. उतावीळपणामुळे निर्णय घेऊन किंवा वाटचाल करून नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी - व्यवसायात अडचणी आल्याने नियोजित काम पूर्ण होऊ शकणार नाही. आणखी वाचा
कन्या: आज आपण एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही. बाहेरचे खाण्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. पैसा जास्त खर्च होईल. हितशत्रू पासून सावध राहा. सरकार विरोधातील काम किंवा अवैध प्रवृत्ती ह्यामुळे संकट ओढवेल. आणखी वाचा
तूळ: आजचा दिवस प्रेमालाप, मनोरंजन व मौज - मस्ती करण्याचा आहे. सार्वजनिक जीवनात महत्व मिळेल. यश व कीर्ती वाढेल. भागीदारांशी लाभाच्या गोष्टी होतील. उंची वस्त्रे व अलंकार यांची खरेदी होईल. उत्तम दांपत्यसुख व वाहनसुख मिळेल. प्रकृती व मनःस्वास्थ्य उत्तम राहील. मित्रांसह सहलीला जाल. आणखी वाचा
वृश्चिक: आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या भेटी रद्द झाल्याने निराश व क्रोधीत व्हाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. मातुला कडून एखादी अप्रिय बातमी मिळाल्याने मन व्यथित होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. प्राप्ती कमी व खर्च जास्त अशी स्थिती राहील. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य व अभ्यास ह्यामुळे चिंतित व्हाल. कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रणयासाठी मात्र अनुकूलता लाभेल. प्रिय व्यक्तीसह सुखद क्षणांचा अनुभव घेता येईल. साहित्य व लेखन क्षेत्रात रस राहील. आणखी वाचा
मकर: आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने मन खिन्न होईल. शारीरिक स्फूर्ती, तरतरी ह्यांचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे. छातीत दुखणे संभवते. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत येऊ शकता. आणखी वाचा
कुंभ: आज आपणास चिंतामुक्त झाल्याने जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. दांपत्य जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आर्थिक लाभ व सामाजिक मान - प्रतिष्ठा मिळेल. आणखी वाचा
मीन: आज आपणास बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. रागामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. विशेषतः डोळ्यांकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीय व प्रियजन ह्यांच्याशी मतभेद संभवतात. विनाकारण खर्च होतील. आपल्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव होईल. खाण्या - पिण्यावर संयम ठेवावा लागेल. एकंदरीत आजचा दिवस विचार पूर्वक वागण्याचा आहे. आणखी वाचा
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"