मेष: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल. मातृ घराण्या कडून फायदा होईल. मित्र, स्नेही व सोबती भेटल्याने घरातील वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आपले मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात. कुटुंबीय किंवा आप्तजन यांचा विरोध राहील. आज सुरू केलेली सर्व कामे अपूर्ण राहतील. वायफळ खर्च होईल. एखादा अपघात संभवतो. खूप परिश्रम करून सुद्धा आज अपेक्षित फलप्राप्ती होणार नाही. आणखी वाचा
मिथुन: आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने मनास प्रसन्न वाटेल. मान - सन्मान वाढतील. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल. सांसारिक सुख उत्तम मिळेल. आज सरकारी कामात येणारे अडथळे दूर होऊन आपला मार्ग मोकळा होईल. आणखी वाचा
कर्क: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. मंगल कार्य, प्रवास ह्यामुळे आपल्या आनंदात भर पडेल. कुटुंबियांसह चांगल्या प्रकारे वेळ जाईल. परदेशगमनाची इच्छा बाळगणारे, तसेच नोकरदारांना लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
सिंह: आज आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. राग व बोलणे ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. बाहेरच्या खाण्या - पिण्यामुळे प्रकृती बिघडेल. आपल्या मनात नकारात्मक विचार येतील. अवैध कामात कोठेही सहभागी न होण्याविषयी दक्ष राहा. मनाला दिलासा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. आणखी वाचा
कन्या: आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्य जीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल. नव्या वस्त्रालंकाराची खरेदी करून ते वापरण्याची संधी मिळेल. त्यांच्याशी मैत्री जुळेल. आजचा दिवस भागीदारीसाठी अनुकूल आहे. प्रवास पर्यटनाची शक्यता आहे. आणखी वाचा
तूळ: आजचा दिवस अत्यंत लाभदायी आहे. नोकरीत यश मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी सहकारी चांगले सहकार्य करतील. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. आजचा दिवस आर्थिक योजना बनविण्यासाठी अनुकूल आहे. परिश्रम प्रगति पथावर नेतील. आणखी वाचा
वृश्चिक: आज आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मैत्रिणी भेटतील. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल व खोळंबलेली कामे मार्गी लागतील. आणखी वाचा
धनु: आज आपणात शारीरिक व मानसिक स्फूर्ती व उत्साह ह्यांचा अभाव राहील. कुटुंबात क्लेश व कलहजन्य वातावरण राहिल्याने मनात उदासीनता राहील. निद्रानाशाचा त्रास होईल. सार्वजनिक जीवनात अपमान होण्याचे प्रसंग येतील. स्त्रीवर्गाकडून हानी संभवते. नदी, तलाव, समुद्र अशा जलाशयांपासून सांभाळून राहा. आणखी वाचा
मकर: आजचा दिवस सुखात जाईल. अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपण प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. मन प्रसन्न राहील. व्यापार - व्यवसायात आर्थिक लाभ होतील. भागीदारीत फायदा होईल. भावंडांसह वेळ खूप चांगला जाईल. एखादे नवे कार्य सुरू करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होईल. आणखी वाचा
कुंभ: आज आपल्या द्विधा मनःस्थिती मुळे निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. त्यामुळे विपरीत परिणाम होईल.प्रकृती सुद्धा साथ देणार नाही. वाणीवर ताबा न राहिल्याने वाद - विवाद होऊन आपल्याच लोकांशी मतभेद होतील. कामात अल्प प्रमाणात यश मिळेल. नाहक खर्च व धनहानी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील. आणखी वाचा
मीन: आज आपणास आनंद, उत्साह व प्रसन्नतेचा अनुभव येईल. नवीन कार्यारंभ लाभदायक ठरेल. मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. प्रवास संभवतात. आर्थिक लाभ होईल. परोपकारी कार्यावर खर्च होईल. ठरवलेली कामे पूर्ण होतील. दांपत्य जीवनात सुख प्राप्ती होईल. कुटुंबात शांततेचे वातावरण पसरेल. आणखी वाचा
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"