‘मले बी वोटिंग ले यऊ द्या की...हो!’ मतदार जागृतीसाठी शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जागर  

By रवी दामोदर | Published: April 20, 2024 04:23 PM2024-04-20T16:23:57+5:302024-04-20T16:25:38+5:30

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘स्वीप’द्वारे नियमित कार्यक्रम घेतले जात आहेत.

to increase the percentage of voting the teachers of zilla parishad in akola creating voter awareness | ‘मले बी वोटिंग ले यऊ द्या की...हो!’ मतदार जागृतीसाठी शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जागर  

‘मले बी वोटिंग ले यऊ द्या की...हो!’ मतदार जागृतीसाठी शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जागर  

रवी दामोदर, अकोला: लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘स्वीप’द्वारे नियमित कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याअंतर्गत जिल्हा परीषदेच्या शिक्षकांकडूनही पथनाट्याद्वारे जिल्ह्यात मतदार जागृती होत आहे. शहरात शनिवार, दि.२० एप्रिल रोजी खास वऱ्हाडी शैलीत गाणी गात मतदार जनजागृती करण्यात आली.  

या पथनाट्याला जिल्हाभर मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हिंमत ढाळे, राजेश देशमुख, निलेश कवडे, संजय जगताप, धिरज चावरे, सुनिल दिवनाले, संजय गावंडे, विद्याताई बनाफर, वैशाली दोंदलकर, रजनी मेतकर, मेघा बुलबुले, दीपमाला भटकर आणि पंकज वानखडे (ढोलकी वादक) आदी कलावंतांचा या उपक्रमात सहभाग आहे. ‘मले बी वोटिंग ले येऊ द्या की...’ अशी गाणी व वऱ्हाडी बोलीतील प्रभावी संवादाच्या माध्यमातून मतदानाची योग्य पद्धत, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य आदी बाबी हे कलावंत मार्मिक, मिश्किल व खुसखुशीत सादरीकरणातून मतदारांना पटवून देत आहेत.

Web Title: to increase the percentage of voting the teachers of zilla parishad in akola creating voter awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.