अकोला-पश्चिम निवडणूक निकाल : काँग्रेसचे साजीद खान आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:44 AM2019-10-24T11:44:41+5:302019-10-24T12:52:16+5:30

Akola-west Vidhan Sabha Election Results 2019: Govardhan Sharma vs Sajid khan Pathan साजीद खान यांनी 10777 मतांची आघाडी घेतली आहे.

Akola-west Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019 sajid khan take lead | अकोला-पश्चिम निवडणूक निकाल : काँग्रेसचे साजीद खान आघाडीवर

अकोला-पश्चिम निवडणूक निकाल : काँग्रेसचे साजीद खान आघाडीवर

Next

अकोला : अकोला पश्चिम हा गेल्या २५ वर्षापासून भाजपाचा गड आहे. गोवर्धन शर्मा यांच्या रूपाने या गडाला जमिनीवरचा गडकरी लाभला असल्याने भाजपाला येथे पराभूत करणे विरोधकांना शक्य झाले नाही. यावेळी मात्र काँग्रेसच्या साजीद खान पठान यांनी मतमोजणीत मोठी आघाडी घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सातव्या फेरी अखेर साजीद खान पठान यांना 49062 मते मिळाली असून, भाजपच्या गोवर्धन शर्मा यांना 34498 मते मिळाली आहेत. साजीद खान यांनी 10777  मतांची आघाडी घेतली आहे.
यावेळी शर्मा हे सहाव्यांदा रिंगणात आहेत. साजीद यांनी मोठी आघाडी घेतल्याने गोवर्धन शर्मा यांची डबल हॅटट्रिक हुकण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी, मुस्लीम समाजाचे एकगठ्ठा मतदान यामुळे येथे मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले असले, तरी साजीद खान यांना मोठ्या प्रमाणात मते मिळत असून, त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

Web Title: Akola-west Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019 sajid khan take lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.