अकोला-पश्चिम निवडणूक निकाल :  गोवर्धन शर्मा यांची डबल ‘हॅट्ट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 07:47 PM2019-10-24T19:47:26+5:302019-10-24T19:48:43+5:30

Akola-west Vidhan Sabha Election Results 2019: गोवर्धन शर्मा यांचा अवघ्या २६६२ मतांनी निसटता विजय झाला.

Akola-west Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019 Govardhan Sharma double hat tric |  अकोला-पश्चिम निवडणूक निकाल :  गोवर्धन शर्मा यांची डबल ‘हॅट्ट्रिक’

 अकोला-पश्चिम निवडणूक निकाल :  गोवर्धन शर्मा यांची डबल ‘हॅट्ट्रिक’

googlenewsNext

 - आशिष गावंडे
 
अकोला: निकालाच्या दिवशी मतमोजणी दरम्यान सुरुवातीपासून काँग्रेसचे उमेदवार साजीद खान पठाण यांनी भाजप उमेदवार गोवर्धन शर्मा यांच्यावर आघाडी मिळविली होती. शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज देणाऱ्या साजीद खान यांना ६७ हजार ६२९ हजार मते मिळाली तर भाजप उमेदवार गोवर्धन शर्मा यांचा अवघ्या २६६२ मतांनी निसटता विजय झाला. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार साजीद खान पराभूत होऊनही विजयी ठरल्याची भावना अकोलेकरांनी व्यक्त केली.
गत पंचवीस वर्षांपासून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघावर दणदणीत विजयश्री प्राप्त करणाºया भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोवर्धन शर्मा यांना यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने कडवी झुंज दिली. पहिल्या फेरीपासून मतांची आघाडी घेणाºया काँग्रेसचे उमेदवार साजीद खान पठाण यांनी शेवटपर्यंत भाजपला जेरीस आणल्याचे चित्र पाहावयास मिळाले. अखेर २० व्या फेरीनंतर भाजपने काँग्रेसला पीछाडीवर टाकत अवघ्या २ हजार ६६२ मतांनी निसटता विजय मिळविला. या निवडणुकीत भाजपचे गोवर्धन शर्मा यांच्या नावावर ‘डबल हॅट्ट्रिक’ मारल्याची नोंद अकोल्याच्या इतिहासात झाली आहे.
भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघातील मतदारांनी वेळोवेळी हिंदुत्वाच्या अजेंड्यानुसार भाजपच्या पारड्यात मतांचे दान टाकल्याचे चित्र पाहावयास मिळते. भाजपसाठी हा मतदारसंघ कायम अनुकूल मानला जातो. गत २५ वर्षांचा इतिहास पाहता या विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचा दबदबा दिसून येतो. गोवर्धन शर्मा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून, २०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नसली तरी त्यांना मिळालेले मताधिक्य पाहता या मतदारसंघात भाजपची तटबंदी फार मजबूत असल्याचे लक्षात येते. २०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत आ. गोवर्धन शर्मा यांना ६६ हजार ९३४ मते मिळाली होती. यंदा शर्मा यांना ७० हजार २९१ मते प्राप्त झाली. पक्षाचे तगडे नेटवर्क आणि संकटसमयी मतदारांनी तारल्याची बाब गोवर्धन शर्मा यांच्या पथ्यावर पडल्याचे निकालाअंती समोर आले आहे. सलग सहाव्यांदा गोवर्धन शर्मा विजयी झाले असले तरी काँग्रेसने दिलेली निकराची लढाई अकोलेकरांच्या कायम स्मरणात राहील, हे तेवढेच खरे.

 

Web Title: Akola-west Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019 Govardhan Sharma double hat tric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.