वर्धा-भूसावळ एक्स्प्रेस, नाशिक-बडनेरा मेमू सोमवारी रद्द

By Atul.jaiswal | Published: May 4, 2024 05:50 PM2024-05-04T17:50:23+5:302024-05-04T17:51:07+5:30

वर्धा-भूसावळ एक्स्प्रेस व नाशिक-बडनेरा मेमू प्रस्थान स्थानकांवरून रद्द करण्यात आली आहे. याशिवाय सहा अन्य एक्स्प्रेस गाड्या रेग्यूलेट करण्यात आल्या आहेत.

Wardha-Bhusawal Express, Nashik-Badnera MEMU canceled on Monday | वर्धा-भूसावळ एक्स्प्रेस, नाशिक-बडनेरा मेमू सोमवारी रद्द

वर्धा-भूसावळ एक्स्प्रेस, नाशिक-बडनेरा मेमू सोमवारी रद्द

अकोला : मध्य रेल्वे भुसावळ विभागातील नांदुरा ते जलंब स्थानकांदरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी सोमवार, ६ मे रोजी ट्रॅफिक ब्लॉक परीचालीत करणार आहे. परिणामी या दिवशी वर्धा-भूसावळ एक्स्प्रेस व नाशिक-बडनेरा मेमू प्रस्थान स्थानकांवरून रद्द करण्यात आली आहे. याशिवाय सहा अन्य एक्स्प्रेस गाड्या रेग्यूलेट करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या भूसावळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून शनिवारी जारी पत्रकानुसार, नांदुरा ते जलंब स्थानकांदरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी सोमवार, ६ मे रोजी अप व डाऊन मार्गावर १४:२० ते १६:६० वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक परीचालीत करणार आहे. त्यामुळे गाडी क्रमांक १११२१ व १११२२ वर्धा- भुसावळ-वर्धा एक्स्प्रेस व गाडी क्रमांक ०१२१२ व ०१२१२ नाशिक-बडनेरा-नाशिक मेमू ६ मे रोजी प्रस्थान स्थानकांवरून रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्या केल्या रेग्यूलेट

गाडी :                              रेग्यूलेट कालावधी
०७११६ जयपूर-हैदराबाद विशेष - ०२. ४५ तास
२०८०४ अजमेर-पुरी एक्स्प्रेस - ०२.०० तास
०११४० मडगांव-नागपूर विशेष - ०१.४५ तास
११०४० गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस - ०१.०० तास
०१३६६ बडनेरा-भुसावळ मेमू - ०१.१० तास
१२४८५ नांदेड-श्री गंगानगर एक्स्प्रेस - ००. ३५ मिनिटे

Web Title: Wardha-Bhusawal Express, Nashik-Badnera MEMU canceled on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.