सासुरवाडीत जावयाचा नेहमीच राडा; मेव्हण्याने कुऱ्हाडीचा घाव घालून कायमचा आवाज बंद केला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 07:01 PM2024-05-07T19:01:43+5:302024-05-07T19:03:52+5:30

पतीचा सासरवाडीत पत्नीसोबत वाद झाला, हा वाद विकोपाला गेल्याने मेव्हणा संतापला

sister's husband killed by brother-in-law due to dispute | सासुरवाडीत जावयाचा नेहमीच राडा; मेव्हण्याने कुऱ्हाडीचा घाव घालून कायमचा आवाज बंद केला

सासुरवाडीत जावयाचा नेहमीच राडा; मेव्हण्याने कुऱ्हाडीचा घाव घालून कायमचा आवाज बंद केला

हिंगोली : आमच्या येथे येऊन वारंवार वाद का करतो या कारणावरून मेव्हण्याने भावोजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केला. ही घटना तालुक्यातील बोराळा येथे ६ मे च्या मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकरणी मेव्हण्यासह सासरा व पत्नीविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष बबनराव सराफ (वय ४० रा. मंगळवारा बाजार हिंगोली) असे मयताचे नाव आहे. संतोष सराफ हे सोमवारी रात्री बोराळा येथे सासुरवाडीला गेले होते. यावेळी त्यांचा सासरवाडीत पत्नीसोबत वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. यातूनच तु आमच्या येथे येऊन वारंवार वाद का करतो, या कारणावरून संतोष सराफ यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. 

या प्रकरणी संतोष मारोतराव देशमुख (रा. कडोळी ता. सेनगाव)  यांच्या फिर्यादीवरून बाळू किसनराव देशमुख, किसनराव दिगंबरराव देशमुख (दोघे रा. बोराळा ता. हिंगोली), ज्योती संतोष सराफ (रा. मंगळवार बाजार हिंगोली) यांचेविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे, सहायक पोलिस निरीक्षक व्ही.जी. रामोड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बाळू देशमुख यास ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे तपास करीत आहेत.

Web Title: sister's husband killed by brother-in-law due to dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.